Raigad: रायगड नंतर कुलाबा किल्यावरील अनधिकृत मदार हटविण्याची मागणी

किल्ले रायगडावर अनधिकृतपणे तयार करण्यात आलेले मदार मोर्चा प्रकरण ताजे असताना अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला आणि सरसगड येथेही अज्ञात व्यक्तींनी अनधिकृत मदार बांधली आहे.
Raigad: रायगड नंतर कुलाबा किल्यावरील अनधिकृत मदार हटविण्याची मागणी
Raigad: रायगड नंतर कुलाबा किल्यावरील अनधिकृत मदार हटविण्याची मागणीराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर -

रायगड : किल्ले रायगडावर अनधिकृतपणे तयार करण्यात आलेले मदार मोर्चा प्रकरण ताजे असताना अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला आणि सरसगड येथेही अज्ञात व्यक्तींनी अनधिकृत मदार बांधली आहे. याबाबत सरखेल कान्होजी आंग्रे (Kanhoji Angre) यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी अनधिकृत मदार त्वरित हटवा आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा पुसण्याचे काम अनेक किल्ले आणि गडावर सुरू असून येथील जमीन हस्तगत करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप रघुजीराजे आंग्रे यांनी केला आहे.

Raigad: रायगड नंतर कुलाबा किल्यावरील अनधिकृत मदार हटविण्याची मागणी
Sambhajiraje Chhatrapati: यांच्या पुढाकारानंतर त्या प्रार्थना स्थळाचे काम थांबले

किल्ले रायगड (Raigad) मदार मोर्चा प्रकरणाबाबत छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी पुरातत्व विभागाला (Department of Archeology) पत्र दिल्यानंतर त्वरित येथील रंगरंगोटी हटवून ठिकाण पूर्ववत केले. तसेच सुरक्षा रक्षक ही तैनात केले आहेत. हे प्रकरण ताजे असताना समुद्रातील किल्याची राजधानी असलेल्या कुलाबा किल्ला आणि सरसगड (Colaba Fort and Sarasgad) या किल्यावरही अनधिकृत मदार बांधण्यात आली आहे. कुलाबा किल्ला येथील तोफाच्या परिसरात असलेल्या ठिकाणी मदारचे काम अनधिकृतपणे (Unauthorized) करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

कुलाबा किल्ल्यात पुरातन एक दर्गा हा पूर्वीपासून आहे याबाबत कोणताही आक्षेप नाही. मात्र दुसरा बांधण्यात आलेली ही मदार पूर्णतः अनधिकृत बांधण्यात आली आहे. मात्र हे बांधकाम करताना पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. किल्ल्यात इतर कार्यक्रम वेळी पुरातत्व विभाग हा नेहमीच आक्षेप घेत असतो. पण किल्यावर मदार काम केले जात असताना किल्ल्यावरील (Fort) अधिकारी, कर्मचारी कुठे होते असा सवाल रघुजीराजे आंग्रे यांनी उपस्थित केला आहे. कुलाबा किल्ल्यावरील हे अनधिकृत मदार बांधकाम त्वरित हटवून दुर्लक्ष केलेल्या अधिकारी कर्मचारी याच्यावर कारवाई करा अशी मागणी निवेदनाद्वारे पुरातत्व विभागाकडे केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com