बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू  Saam Tv
महाराष्ट्र

बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

28 टक्के महागाई भत्ता द्या, अन्यथा उद्यापासून बस स्थानकाच्या गेटवर आंदोलन करणार - आंदोलक

विनोद जिरे

बीड - राज्य शासनाच्या विरोधात नाराज एसटी संघटनासह कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. बीडच्या विभागीय कार्यालयासमोर, एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

हे देखील पहा :

यावेळी राज्य शासनात एसटीचे तात्काळ विलीनीकरण करण्यात यावे, वार्षिक वेतन वाढीचा दर 3 टक्के करण्यात यावा, राज्य सरकार प्रमाणे देय तथा महागाई भत्ता अदा करावा, राज्य सरकारप्रमाणे घरभाडे भत्ता अदा करावे, उचल म्हणून साडेबारा हजार दिवाळीपूर्वी अदा करावेत, दिवाळीपूर्वी 15 हजारांचे बोनस मिळावे आणि विशेष म्हणजे 28 टक्के महागाई भत्ता मिळावा. यासाठी विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान आतापर्यंत 25 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

त्याचबरोबर जवळपास साडेतीनशे कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झालाय, तरी देखील या सरकारला जाग आली. त्यामुळं संध्याकाळपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास, उद्यापासून बसस्थानकाच्या गेटवर आंदोलन करण्यात येईल. यावेळी सर्व बस बंद देखील राहण्याची शक्यता असून याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल. असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

SCROLL FOR NEXT