बेमुदत संप! अकोल्याच्या बसस्थानकावर प्रवाशांना बस मधून उतरवले खाली  जयेश गावंडे
महाराष्ट्र

बेमुदत संप! अकोल्याच्या बसस्थानकावर प्रवाशांना बस मधून उतरवले खाली

आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनात आज कर्मचाऱ्यांनी बससेवा बंद पाडली आहे.

जयेश गावंडे

अकोला: आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनात आज कर्मचाऱ्यांनी बससेवा बंद पाडली आहे. कर्मचाऱ्यांनी जाणाऱ्या बसला थांबवून त्यामधून प्रवाशांना बाहेर काढले. अकोल्यातील मध्यवर्ती बसस्थानकावर बाहेरून आलेले शेकडो प्रवाशी ताटकळत बसले आहेत. मिळेल त्या वाहनाने प्रवाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. एसटी कर्मचारी संघटना व राज्य सरकार यांच्यात झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने अकोल्यातील मध्यवर्ती बसस्थानकात बेमुदत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे पहाटेपासूनच अकोल्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.

तर काही प्रवाशांनी खाजगी गाड्यांचा सहारा घेतला आहे. त्यामुळे बस स्थानकासमोर ऑटो ची तुफान गर्दी झाली असून ऑटो चालकांनी दर ही वाढवले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एसटी संघटना राज्य सरकारकडे गेले अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. तसेच त्यांच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू होता. पण यात तोडगा निघाला नसल्याने आजपासून अकोला विभागामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. एसटी आता जागेवरच थांबलेली आहे. तर संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

SCROLL FOR NEXT