Lasooni Palak Paneer Recipe: रोजचा वरण भात खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा लसुणी पालक पनीर, वाचा रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

झटपट रेसिपी


मुलांसाठी दुपारच्या जेवणात खास पौष्टीक रेसिपी बनवायची असेल तर ही लसुणी पालक पनीर रेसिपी झटपट आणि टेस्टी बनवण्याची रेसिपी वाचाच.

Lasooni Palak Paneer Recipe

लसुणी पालक बनवण्याचे साहित्य

पालक, पनीर, लसुण, कांदा, टॉमॅटो, हिरवी मिरची, आलं-लसणाची पेस्ट, सगळे मसाले, जीरं, लाल सुक्या मिरच्या, फ्रेश मलई, तूप, आणि मीठ इ.

garlic palak paneer

स्टेप १

सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळवून घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा साखर आणि पालक ठेवा. मग ५ मिनिटांनी लगेच थंड पाण्यात घाला.

garlic palak paneer

स्टेप २

आता पालकची बारिक पेस्ट करुन घ्या. मग एका कढईत तेल आणि तूप तापवा. त्यात जिरं, बारिक कांदा, मिरची, आलं-लसणाची पेस्ट घालून छान फोडणी द्या.

palak paneer recipe

स्टेप ३

पुढे त्यात टॉमॅटोची पेस्ट आणि सर्व मसाले घालून छान शिजवा. साहित्याला तेल सुटल्यावर पालकची पेस्ट घालून घ्या.

kids lunch recipe

स्टेप ४

५ ते १० मिनिटं पालक छान शिजवून घ्या. पाण्याचा वापर तुमच्यानुसार ठरवू शकता. पण जास्त पाणी टाळाच.

palak paneer dish

स्टेप ५

शेवटी त्यामध्ये तेलात तळलेलं पनीर घालून घ्या. पुढे मलई क्रिम मिक्स करुन घ्या. मग २ मिनिटांनी गॅस बंद करा.

palak paneer dish

स्टेप ६

डिश सर्व्ह करायला घेण्याआधी एका फोडणीच्या भांड्यात तुप, लसूण, सुकी लाल मिरची छान तडतडवून त्यावर घाला आणि सर्व्ह करा.

palak paneer dish

NEXT: Chiffon Saree Cleaning: शिफॉन साड्यांची चमक धुतल्याने जातेय? टेन्शन सोडा या 7 टिप्स करा फॉलो

Chiffon Saree Cleaning | google
येथे क्लिक करा