ST Strike : कृती समितीतील तीन संघटना महाविकास आघाडीच्याच कर्मचाऱ्यांचा आरोप!
ST Strike : कृती समितीतील तीन संघटना महाविकास आघाडीच्याच कर्मचाऱ्यांचा आरोप! राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

ST Strike : कृती समितीतील तीन संघटना महाविकास आघाडीच्याच; कर्मचाऱ्यांचा आरोप!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : एसटी कर्मचाऱ्याच्या संपाची हाक अलिबाग आगाराने आणि कनिष्ठ वेतन कर्मचारी संघटनेने दिली होती. कृती समितीत राज्यातील बावीस संघटना आहेत. आझाद मैदानावर 18 संघटनेचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. मात्र मंत्री महोदयासोबत चर्चेला काँग्रेसची इंटक, शिवसेनेची कामगार सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामगार संघटना या सरकारच्या पक्षातील संघटनेचे कृती समितीतील सदस्य उपस्थित होते.

हे देखील पहा :

त्यामुळे ज्यांनी संपाची हाक दिली त्यांच्यासोबत शासनाला चर्चा करायला वेळ नाही. असा आरोप अलिबाग आगारातील कर्मचाऱ्यांनी केला आहे. आमची आजही विलीनीकरणाची मागणी ही ठाम आहे. अशी भूमिका अलिबागमधील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

जिल्ह्यात पाच आगारातील कर्मचारी हे पुन्हा कामावर रुजू झाले असले तरी ते कर्मचारी संख्येपेक्षा दोन टक्केच आहेत. पुन्हा हे कर्मचारी संपात सहभागी होतील अशी आशा आहे. ज्यांनी अधिकृत संपाची हाक दिली त्यांना बाजूला ठेवून ज्याचा काहीही संबंध नाही अशांना बोलणी करण्यासाठी बोलवता, ज्याचा संबंध नाही ते आम्हाला संप मोडीत काढून कामावर हजर होण्याचे आदेश देत आहेत. त्यामुळे हे सदस्य संपावर तोडगा काढण्यासाठी गेले होते की मोडीत काढण्यासाठी असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT