एसटी महामंडळाने उचलला निलंबनाच्या कारवाईचा बडगा; जिल्ह्यातील 186 कर्मचारी निलंबित दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

एसटी महामंडळाने उचलला निलंबनाच्या कारवाईचा बडगा; जिल्ह्यातील 186 कर्मचारी निलंबित

कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा इशारा

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातुर : संप कायम ठेवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी महामंडळाकडून विभागीय नियंत्रकांना कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे थेट आदेश देण्यात आले आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाऐवजी थेट बडतर्फच्या कारवायाचे संकेत दिले आहे.

हे देखील पहा-

जिल्ह्यात 28 ऑक्टोबर पासून एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण करण्यासाठी बेमुदत संपाच हत्यार उपसले आहे. उच्च न्यायालयाने सदरचा सानप बेकायदेशीर असून कामावर तातडीने रुजू व्हावे असे आदेश देण्यात आले, असताना सुध्दा कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. आता एसटी महामंडळाच्या वतीने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

काल 116 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यापूर्वी 70 कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. आता निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 186 झाली आहे. तुटेपर्यत ताणू नये, असे एसटी महामंडळ प्रशासनाचे मत आहे. इतर कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन एसटीचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी यावेळी केले आहे.

Edited by- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT