एसटी महामंडळाने उचलला निलंबनाचा बडगा; जिल्ह्यातील 950 कर्मचाऱ्यांपैकी 124 कर्मचारी निलंबित गजानन भोयर
महाराष्ट्र

एसटी महामंडळाने उचलला निलंबनाचा बडगा; जिल्ह्यातील 950 कर्मचाऱ्यांपैकी 124 कर्मचारी निलंबित

पगारवाढी नंतर परिवहन मंत्र्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्याना कामावर हजर राहण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गजानन भोयर

वाशिम : वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 22 दिवसापासून एस.टी.महामंडळ कर्मचाऱ्याचे विलीनीकरणच्या मागणीकरिता आंदोलन सुरू आहे. पगारवाढी नंतर परिवहन मंत्र्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्याना कामावर हजर राहण्याचे आव्हान करण्यात येत आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यात या आव्हानाला न जुमानता आंदोलन कर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने वाशिम जिल्ह्यातील चारही आगारातील आगारामधून एक ही बस बाहेर पडली नाही.

हे देखील पहा-

यामुळे महामंडळाने आज तडका फडकी निर्णय घेत महामंडळाच्या 85 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याआधी जिल्ह्यात 39 जणांचे निलंबन केले होते तर आज कारंजा 20, मंगरुळपिर 20, रिसोड 20 आणि वाशिम आगारातील 25 असे एकूण 85 जणांचे निलंबन करण्यात आले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 950 कर्मचाऱ्यांपैकी 124 कर्मच्यांऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. आज आमचे निलंबन झाले आहे. जिल्ह्यात सर्व कर्मचारी निलंबित झाले, तरी चालेल. मात्र, जोपर्यंत आमचे शासनात विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत आम्ही संप सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

Tuesday Horoscope : प्रेम, पैसा आणि यश मिळणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू

धनूभाऊंनी दिली जरांगेंची सुपारी? जरांगेंच्या घातपातासाठी अडीच कोटींची डील?

SCROLL FOR NEXT