ST Mahamandal Saam Tv
महाराष्ट्र

ST Bus Helpline: विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! बसला उशिर झाला, रद्द झाली थेट 'या' नंबरवर तक्रार करा

MSRTC ST Mahamandal Big Decision For Students: एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. जर तुमची बस उशिराने आली किंवा रद्द झाली तर तुम्हाला या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करता येणार आहे.

Siddhi Hande

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

एसटी उशिराने आली किंवा रद्द झाली तर त्यासाठी तक्रार करता येणा

परिवहन विभागाने जारी केला हेल्पलाइन नंबर

गावाखेड्यातील मुले शाळेला- कॉलेजला जातात एसटी बसचा वापर करतात. अनेकदा एसटी बस उशिराने असतात किंवा रद्द होतात. मात्र याबाबत माहिती विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी तासनतास स्टँडवर उभे राहावे लागते. दरम्यान, एसटी कधी येणार याबाबत कोणालाच माहित नसते. याचसाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एसटी वेळवर आली नाही किंवा रद्द झाली तर विद्यार्थ्यांना हेल्पलाइन नंबरवरुन मदत मागता येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी (ST Helpline Number For Students)

एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी १८००२२१२५१ हा हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. यावरुन विद्यार्थ्यांना तक्रार करता येणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांना जर काही अडचण आली तर विद्यार्थी किंवा मुख्याध्याप विभाग नियंत्रकांना संपर्क साधून समस्या मांडू शकतात. बस उशिरा सुटल्याने किंवा रद्द झाल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेत पोहचायला उशिर होतो. अनेकदा परीक्षेसाठी उशिर झाल्यावर परीक्षेला बसून दिले जात नाही. आता विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीसाठी संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना जबाबदार धरले जाणार आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यावर अधिकारी निलंबित

सोमवावर ते शुक्रवार या कालावधीत संध्याकाळी ५-६ वाजता विद्यार्थ्यांची चढ-उतार जास्त असते. तिथे आगार पर्यवेक्षकांनी थांबून वाहतूकीचे नियोजन करायचे आहे. शाळेचा शेवटचा मुलगा घरी जाईपर्यंत संबंधित पर्यवेक्षकांना तिथेच थांबायचे आहे. दरम्यान, जर बस फेऱ्यांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकासन झाले तर तितके दिवस जबाबदार पर्यवेक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल, असं प्रताप सरनाईकांनी सांगितले आहे.

विद्यार्थ्यांना मासिक पासमध्ये सवलत

शालेय विद्यार्थ्यांना मासिक पासमध्ये ६६.६६ टक्के सूट दिली जाते. बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत पास दिले जातात. अनेकदा विद्यार्थ्यांना घरी जायला उशिर झाल्यावर पालकांच्या काळजी लागलेली असते. अशा परिस्थिती हा हेल्पलाइन नंबर उपयुक्त ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उमेदवारांचा प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात

Pneumonia prevention: हिवाळ्याच्या दिवसात वाढतोय न्यूमोनियाचा संसर्ग; तज्ज्ञांनी सांगितलेली काळजी तातडीने घ्या

Aadhaar Card: UIDAI चा मोठा निर्णय! २ कोटी आधार कार्ड कायमचे बंद; तुमचं नाव तर नाही ना? वाचा सविस्तर

Makhana Chivda Recipe: कुरकुरीत मखाना चिवडा कसा बनवायचा?

Bigg Boss 19 : बाई काय हा प्रकार! अशनूर कौरने तान्या मित्तलला टास्क दरम्यान मारले? VIDEO पाहून नेटकरी संतापले

SCROLL FOR NEXT