धक्कादायक! एसटी बस चालकाची गळफास लावून आत्महत्या Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! एसटी बस चालकाची गळफास लावून आत्महत्या

या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर - शेवगाव येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील पहा -

दिलीप हरिभाऊ काकडे असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून ते चालक म्हणून येथील आगारात कार्यरत होते. दिलीप काकडे यांनी डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. दिलीप काकडे यांचे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT