MSRTC Bus Fire  saam tv
महाराष्ट्र

MSRTC Bus Fire : अमरावती-नागपूर महामार्गावर एसटी बस पेटली; 35 प्रवासी थोडक्यात बचावले

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरही राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला आग लागली.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : पुण्यात येरवडा येथे आज, मंगळवारी बसला भीषण आग लागलेली असतानाच, आता अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरही राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला आग लागली. या भीषण दुर्घटनेतून ३५ प्रवासी थोडक्यात बचावले. महामार्गावरच बस पेटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मागील तासाभरापासून महामार्गावरील वाहतूक ठप्प असल्याची माहिती मिळते.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अमरावती शहरापासून २० किलोमीटर दूर पिंपळविहीर गावाजवळ एसटी (ST Bus) बसला अचानक आग (Fire) लागली. ही एसटी ३५ प्रवासी घेऊन निघाली होती. या एसटी बसला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने बसमधील ३५ प्रवासांचे प्राण वाचले. नागपूर आगाराची ही एसटी बस होती. अमरावतीवरून ही बस नागपूरच्या दिशेने रवाना झाली होती.

दरम्यान, चालत्या एसटी बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याने ही आग सर्वत्र पसरली. त्यानंतर पाहता पाहता एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली. एसटी बसा आग लागल्याने अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. तर अग्निशामक दलाने तासाभरानंतर एसटी बसला लागलेली आग विझविण्यात त्यांना यश आले. घटनेनंतर तासाभरानंतर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरळीत झाली आहे .

पुण्यात ४२ प्रवासी घेऊन निघालेली शिवशाही बस पेटली

खासगी बसला आग लागून प्रवाशांचा बळी गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली असतानाच, पुण्यातील येरवड्यातही भररस्त्यात शिवशाही बस पेटली. या बसमधून ४२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने सर्व ४२ प्रवासी खाली उतरल्यानंतर ही आग लागल्याने मोठा अनर्थ टळला.

पुण्यातील येरवडा येथील शास्त्री चौकात ही घटना घडली. यवतमाळ-चिंचवड शिवशाही बसने भररस्त्यात पेट घेतला. बस नादुरुस्त झाल्याने चालकाने ती रस्त्याच्या बाजूला थांबवली. त्यानंतर बसमधील सर्व ४२ प्रवाशांना खाली उतरवले. काही वेळातच या बसने पेट घेतला. बसमधून आगीच्या ज्वाळा दूरपर्यंत निघत होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SAIL Recruitment: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी; महिन्याला १.६० लाखांचं पॅकेज; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update : महिलांच्या खात्यात १०,००० जमा करा- उद्धव ठाकरेंची मागणी

Shubman Gill vs Rohit Sharma : कॅप्टन शुभमन गिलचं विक्रमी शतक; रोहित शर्माच्या वर्चस्वाला सुरुंग

SBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार स्टेट बँकेत नोकरी; पगार ९३,९६० रुपये; अर्ज कसा करावा?

ED Raids : ईडीची रिलायन्सवर मोठी कारवाई, अंबानींच्या विश्वासूला ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT