Nashik Accident Saam TV
महाराष्ट्र

Nashik Accident : नातीला शाळेत सोडण्यासाठी निघाले, वाटेतच काळाची झडप; भीषण अपघातात आजोबा अन् नातीचा मृत्यू

Mumbai-Agra highway accident : दुचाकीवरून आजोबा दोन शाळकरी विद्यार्थिनींना शाळेत सोडण्यासाठी जात होते. अपघातात दुचाकी थेट एसटीबसच्या चाकाखाली आली. त्यामध्ये आजोबा आणि एक शाळकरी विद्यार्थिनी चिरडली गेली.

Ruchika Jadhav

अजय सोनवणे, मनमाड

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मुंगसे गावा जवळ एसटी बस आणि दुचाकींची एकमेकांना जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दुचाकीवरून आजोबा दोन शाळकरी विद्यार्थिनींना शाळेत सोडण्यासाठी जात होते. अपघातात दुचाकी थेट एसटीबसच्या चाकाखाली आली. त्यामध्ये आजोबा आणि एक शाळकरी विद्यार्थिनी चिरडली गेली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झालाय. तर एक विद्यार्थिनी यामधून बचावली असून ती गंभीर जखमी आहे.

सिताराम सूर्यंवंशी हे सकाळच्या सुमारास आपल्या दोन नातींना घेऊन शाळेत परिक्षेच्या पेपरसाठी सोडवायला दुचाकीवरुन जात होते. यावेळी नाशिककडून मालेगावकडे जाणा-या बसची धडक बसल्याने दुचाकी बसच्या खाली गेली. यात आजोबा सिताराम सूर्यवंशी आणि एका नातीचा मृत्यू झाला तर दुसरी नात गंभीर जखमी झाली. अपघाताचे वृत्त कळताच मुंगसे गावातील नागरीकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोके आंदोलन केले असून वारंवार अपघात होत असल्याने गतीरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान रास्ता रोको आंदोलन सुरु असल्याने प्रांतअधिकारी,पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

आजोबांसह नातीचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेनंतर मुंगसे ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको केला आहे. शाळेत जाताना वाटेतच काळ अशा पध्दतीने घाला घालेल अशी पुसटशीही कल्पना या विद्यार्थिनींच्या मनात आली नसेल. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन भरधाव दुचाकींच्या धडकेत २ जणांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात देखील दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये २ जणांचा जागीच मृत्यू झालाय. सोयगाव तालुक्यातील वरठण- तिडका रस्त्यावर ही घटना घडलीये. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदची निवडणूक रद्द होण्याची शक्यता

Famous Director Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, ५३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Political News : शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच दादांनी पळवला, भोरमध्ये महायुतीत संघर्ष टोकाला

Today Gold Rate : सोन्याचे भाव अचानक बदलले; एका दिवसात दराने पलटली बाजी; आजचा एक तोळ्याचा भाव किती?

Banarasi Saree : अस्सल बनारसी साडी ओळखण्याच्या ७ ट्रिक्स

SCROLL FOR NEXT