Bus accident Saam Tv News
महाराष्ट्र

ST Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात भीषण अपघात, झाडामुळे एसटी बस धरणात पडता पडता वाचली; ७ प्रवासी जखमी

ST Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा भीषण अपघात झालाय. ही बस दाभोळवरून मुंबईच्या दिशेने येत होती. घाटातील उतारावरून जात असताना, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत घरंगळत गेली.

Bhagyashree Kamble

अमोल कलये साम, साम प्रतिनिधी

रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा भीषण अपघात झालाय. ही बस दाभोळवरून मुंबईच्या दिशेने येत होती. घाटातील उतारावरून जात असताना, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत घरंगळत गेली. मात्र, त्या ठिकाणी एक झाड होते. झाडाला ती बस अडकली आणि तिथेच अडकली. देव बलवत्तर म्हणून एका झाडामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. अन्यथा बस धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. या अपघातात ७ जण जखमी असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी बस प्रवाशांना घेऊन, मंडणगड शेनाळे घाटातून जात होती. या घाटात अनेक अतितीव्र उताराचे रस्ते आहेत. यापैकी एका उतारातून जात असताना, चालकाचे गाडीवरील ताबा सुटला. दरीतील झाडाझुडमांमधून बस थेट धरणाच्या दिशेनं गेली. बस वेगाने दरीच्या दिशेने जात असल्याचं पाहून प्रवाशांना जाग आली. या दरीच्या खालच्या बाजूला एक धरण आहे आणि त्याच्या जवळ एक मोठे झाड आहे. मात्र, बस घसरत थेट पंधरा ते वीस फूट दरीत कोसळली. परंतु, धरणाच्या दिशेनं जात असताना, झाडाला धडकली.

दरीत कोसळताना बस झाडाला धडकली आणि तिथेच अडकली. यानंतर बचावपथकाने तातडीने धाव घेत प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले. एसटीत एकूण ४१ प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. एसटीतील प्रवासी सुखरूप असून, त्यांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र, ४१ पैकी ७ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

ही बस दरीत कोसळल्यानंतर एका बाजूला बस पूर्णपणे आडवी पडली होती. या अपघातावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला असून, या व्हिडिओत मागच्या भागातील प्रवासी बाहेर पडत असताना दिसत आहे. मात्र, देव बलवत्तर म्हणून एका झाडामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. हा अपघात नेमका कसा घडला? या अपघातादरम्यान, बसमध्ये प्रवासी किती होते? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, ओढ्याला पूर आल्यामुळे पिंगळी लिमला रस्त्यावरची वाहतूक बंद

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT