Solapur Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Solapur Accident News : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धावत्या एसटी बसचं चाक निखळलं; ७ ते ८ प्रवासी जखमी

ST Bus Accident : सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. अपघातामध्ये सात ते आठ लोक जखमी झाले असून तीन लोक गंभीर जखमी आहेत.

प्रविण वाकचौरे

Solapur News :

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला भीषण अपघात घडला आहे. धावत्या एसटी बसचं मागचं चाक निखळल्याने अपघात घडला आहे. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. अपघातामध्ये सात ते आठ लोक जखमी झाले असून तीन लोक गंभीर जखमी आहेत.

अपघातग्रस्त झालेली बस सोलापूरहून नांदेडला जाण्यासाठी पहाटे निघाली होती. मात्र सोलापुरातील उळे कासेगाव या ठिकाणी एसटी बसचं मागील चाक अचाकन बसपासून वेगळं झालं. बस वेगात असल्याने चाक निखळल्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि उलटी झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर बस महामार्गावर रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली. बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत असल्याने सर्वांनाच एक थरारक अनुभव आला. अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

अपघातातील जखमींना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या अपघातानंतर एसटी बसेसच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Railway News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागणार 'ओटीपी' ; काय आहे रेल्वेचा नियम? वाचा

Shepu Mungdaal Recipe : घराघरात बनणारी स्वादिष्ट शेपू मूगडाळीची भाजी, एकदा करुनच बघा

लग्नात 'रसगुल्ले' संपले अन् महाभारत सुरू झालं, वधू-वर पक्षात तुफान राडा; ताटं, खुर्च्या फेकून मारल्या, VIDEO व्हायरल

DRDO Internship: कोणतीही परीक्षा नाही; डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कसा कराल?

SCROLL FOR NEXT