Ahmednagar News: पोलिसांची गांधीगिरी! नियम मोडणाऱ्यांवर नो अॅक्शन, रिअॅक्शन ओन्ली सोल्युशन

Ahmednagar Police News : पोलिसांची गांधीगिरी! नियम मोडणाऱ्यांवर नो अॅक्शन, रिअॅक्शन ओन्ली सोल्युशन
Ahmednagar Police News
Ahmednagar Police NewsSaam Tv
Published On

सुशील थोरात, अहमदनगर

Ahmednagar Police News :

विनाक्रमांक किंवा फॅन्सी क्रमांक लावून वाहन फिरणाऱ्यांवर अहमदनगर मधील कोतवाली पोलिसांची 'अॅक्शन', 'रिअॅक्शन' आणि 'सोल्यूशन', अशी त्रिसूत्री कारवाई सुरू केली आहे. कोतवाली पोलिसांनी अशी केलेली कारवाई राज्यात पहिल्यांदा झाली आहे. उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या या कारवाईची सध्या नगर जिल्ह्याबरोबर राज्य पोलीस दलात चर्चा आहे.

नगर शहरात दुचाकीवरून येत लुटीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. गुन्हेगारांची शोध घेण्यासाठी वाहनांवरील क्रमांक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे गुन्हा घडला की पहिले वाहन आणि त्यानंतर त्याचा क्रमांक पोलिसांकडून तपासला जातो. परंतु अलीकडच्या काळात नगर शहरात विनाक्रमांक दुचाकी, फॅन्सी नंबर प्लेटच्या दुचाकींची संख्या वाढली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ahmednagar Police News
Who is Rushikesh Bedre : अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीतील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरे नेमका आहे तरी कोण?

याशिवाय गुन्हेगारी देखील वाढली आहे. पोलिसांकडून उपाययोजना होतात. परंतु ठोस असे काही साध्य होत नाही. मात्र कोतवाली पोलीस ठाण्याचे उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शहरातील विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट लावून करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत थेट स्वखर्चातून त्यांना सरकारच्या नियमाप्रमाणे नंबर प्लेट लावून देऊन गांधीगिरी केली. (Latest Marathi News)

कोतवाली पोलिसांनी आज पहिल्या दिवशी अशा 42 वाहनांवर कारवाई केली. विनाक्रमांक आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई, दंड आणि नियमानुसार वाहनाच्या पुढे आणि मागे नंबर प्लेट बसवून दिली आहे. या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नऊ पथके तयार केली होती.

Ahmednagar Police News
India Canada News : तपास पूर्ण न करताच केले आरोप, निज्जर प्रकरणी भारतीय राजदूतांनी कॅनडाची काढली खरडपट्टी

या पथकांनी कारवाई करत वाहन पोलीस ठाण्यात घेऊन यायचे. पोलीस ठाण्यात पथक वाहनांची कागदपत्रे तपासणार आणि त्यावर लगेचच पुढची कारवाई होणार, अशी ही कार्यपद्धती होती. आज या कारवाईत वाहनचालकांना १९,५०० रू दंड आकारण्यात आला आणि विशेष म्हणजे कोतवाली पोलिसांनी सर्व वाहन चालकांना चहाची व्यवस्था केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com