10th Student End Life In Sambhajinagar Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar: १० वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, निकाल लागण्यापूर्वी संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण आलं समोर

10th Student End Life In Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने निकाल लागण्यापूर्वीच आत्महत्या केली. राहत्या घरी त्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • संभाजीनगरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली

  • निकालाच्या भीतीने विद्यार्थ्याने गळफास घेत आयुष्य संपवलं

  • मृत विद्यार्थ्याचे नाव सोहम ज्ञानेश्वर मोरे असे होते

  • या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

माधव सावरगावे, संभाजीनगर

दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. हा निकाल जाहीर होण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. निकालाच्या धास्तीने त्याने टोकाचे पाऊल उचललं. छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगर परिसरात ही घटना घडली. राहत्या घरातच सोहम मोरे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केलेी जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी निकालाच्या भीतीने एका विद्यार्थ्याने आपलं जीवन संपवलं. मी पास होऊ शकणार नाही या भीतीने या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगच्या पुंडलिक नगरमधील गल्ली नंबर १० येथे ही घटना घडली. याठिकामी राहणाऱ्या सोहम ज्ञानेश्वर मोरे (१७ वर्षे) या विद्यार्थ्याने आज सकाळी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

सोहम मोरे दहावीत शिकत होता आणि आज त्याचा निकाल लागणार होता. मात्र आपण परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाही अशी भीती त्याच्या मनात घर करून होती. याच निकालाच्या धास्तीतून सोहमने निकाल लागण्यापूर्वीच आयुष्य संपवलं. सोहमच्या या निर्णयामुळे मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सोहमचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवरील परीक्षेच्या तणावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेल नसल्याचे कारण देत अॅम्बुलन्स सेवा नाकारली गरोदर महिलेच्या पोटात नवजात बाळाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात मोठ झाड कोसळले; 12 दुचाकी झाडाखाली अडकल्या

Online earning ideas: घरबसल्या पैसे कसे कमावू शकता?

Petrol- Diesel Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी महागणार? सर्वसामान्य नागरिक चिंतेत

Bhagyashree Mote Photos: सबसे कातील, भाग्यश्रीचे फोटो पाहून हेच म्हणाल

SCROLL FOR NEXT