SSC-HSC Exam Saam tv
महाराष्ट्र

SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! तोंडी परीक्षेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

SSC-HSC Exam News: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचीही सरमिसळ होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेतही इतर शाळेतील विद्यार्थी परीक्षा घेतील.

Siddhi Hande

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आता प्रात्यक्षिक परीक्षेतही शिक्षकांची सरमिसळ होणार

दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी करणार परिक्षण

दहावी-बारावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसात होणार आहे. दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियोजन केले आहे. याचसोबत आता परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षेतील नियमात बदल झाले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेतील बाह्य परीक्षकांची आता अदलाबदल केली जाणार आहे. आता खासगी शाळांवरील शिक्षण अनुदानित शाळेत तर तेथील शिक्षक इतर शाळांमध्ये परीक्षक म्हणून जाणार आहे. बाह्यपरीक्ष नेमण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. यानंतर १० फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून होणार आहे. १०वीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. या कालावधीत शाळेत बाह्य परीक्षक येणार आहेत. ते प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा घेणार आहेत.

बोर्डाच्या परीक्षेवेळी तर कोणत्याही प्रकराची कॉपी किंवा गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे. यासाठी केंद्रा वॉल कंपाउंड, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे.

लेखी परीक्षेतही शिक्षकांना दुसऱ्या शाळेत परीक्षण करणार

विद्यार्थ्यांची सरमिसळ झाल तर परीक्षा केंद्रांवर अनेक ठिकाणी कॉपी झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता पर्यवेक्षकांचीही सरमिसळ करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. याचसोबत प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहे. तसेच पर्यवेक्षकांचेही कॅमेरे सुरु ठेवण्यास सांगितले आहे. जेणेकरुन परीक्षेतील हालचाली वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT