SSC-HSC Board Exam  deccan Herald
महाराष्ट्र

Burqa Ban: दहावी-बारावी बोर्डाच्या परिक्षेत बुरखाबंदी? विद्यार्थिनींचा बुरखाबंदीला विरोध

SSC-HSC Board Exam: बोर्डाच्या परीक्षेत बुरखा बंदी करण्यावरून राज्यात वाद पेटलाय. राणेंच्या मागणीवर शिक्षणमंत्र्यांची काय भूमिका? मुस्लीम विद्यार्थिनींना काय वाटत? बुरखा बंदी होणार की नाही ? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Snehil Shivaji

बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असताना मंत्री नितेश राणेंनी केलेल्या मागणीवरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे. कॉपी रोखण्यासाठी १० वी, १२ वीच्या विद्यार्थिनींवर बुरखा बंदी लावण्यात यावी असं पत्रच त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेमना पाठवलंय. मात्र यासंदर्भात दादा भुसेंना विचारलं असता त्यांनी मात्र बुरखा बंदीवर थेट बोलणं टाळलं.

कॉपीमुक्तीसाठी शिक्षण विभाग सातत्यानं प्रयत्न करत आहे. क़ॉपी सापडल्यास परीक्षा केंद्रच रद्द करण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं घोषणा करण्यात आलीय. तसंच व्हिडिओ आणि सीसी कॅमेरेही परीक्षेच्या परिसरात लावण्यात येणार आहे. त्यामुळे बुरखा बंदीची मागणी योग्य नसल्याचं मुस्लीम विद्यार्थिनींचं म्हणणंय.

राज्यात मतदानासाठी बुरखाबंदी नसतांना आता परिक्षेसाठीच बुरखा बंदीची मागणी होऊ लागल्यानं ऐन परीक्षेच्या काळात वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुद्यावर शासनानं सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT