Pandharpur Police End Life Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur: पंढरपूर हादरले! आषाढी यात्रेच्या बंदोबस्तावेळी पोलिसाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य

Pandharpur Police End Life: पंढरपूरमध्ये पोलिसाने आत्महत्या केली. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाने डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं.

Priya More
  • पंढरपूरमध्ये पोलिसाची आत्महत्या

  • आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आले असता उचलले टोकाचे पाऊल

  • एसआरपीएफ जवानाने डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य

  • घटनेने पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली

भरत नागणे, पंढरपूर

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तीमय वातावरण आहे. अशातच पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या पोलिसाने गोळी झाडून आयुष्य संपवलं. कामाच्या तणावातून या पोलिसाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास या पोलिसाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुरमध्ये आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एका राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने आत्महत्या केली. डोक्यात गोळी झाडून घेत या पोलिसाने आयुष्य संपवलं. पंढरपुरमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसाने हे टोकाचे पाऊल उचललं. या घटनेने संपूर्ण पोलिस दलात एकच खळबळ उडाली. कामाच्या तणावातून जवानाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रामेश्वर ध्रुपद साबणे असे या पोलिसाचे नाव होते. तो मूळचा परभणीच्या गंगाखेड येथील रहिवासी होता.

ही दुर्दैवी घटना आज पहाटे अडीज वाजताच्या सुमारास कासेगाव रोडवरील मुक्कामाच्या ठिकाणी घडली आहे. रामेश्वर साबणे हे संभाजी नगर येथे एसआरपीमध्ये जवान म्हणून कार्यरत होते होते. आषाढी यात्रेनिमित्ताने ते ३ ते ४ दिवसांपासून पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी आले होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःच्या रिवाल्वर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. याबाबत स्थानिक पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ११ महिन्यांच्या बालिकेने गिळले क्रीम ट्यूबचे टोपण; डॉक्टरांनी वाचवले प्राण

Fact Check: पुण्यात भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'त्या' व्हिडिओमागचे खरे सत्य आले समोर

Coconut Water Benefits: उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर प्या नारळपाणी; मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले, १ कोटी बहिणींना...

प्रतापराव पवार : सामाजिक उद्योजकतेचे मूर्तिमंत उदाहरण

SCROLL FOR NEXT