Akola Crime: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न; अकोला हादरले

Akola Police: अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर पोलिसाने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे.
Akola Crime: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न; अकोला हादरले
Akola CrimeSaam Tv
Published On
  • अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर पोलिसाकडून बलात्कार

  • ज्या घरात भाड्याने राहत होता त्या घराच्या मालकाच्या मुलीसोबत भयंकर कृत्य

  • आरोपी पोलिस सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे

अकोल्यामध्ये पोलिसाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा पोलिस ज्या घरात भाड्याने राहत होता त्याच घरमालकाच्या मुलीसोबत त्याने हे भयंकर कृत्य केले. या घटनेनंतर चिंतेत आलेल्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या मुलीची प्रकृती गंभीर असून ती कोमात गेली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेच्या निषेधार्थ नातेवाईकांसह गावकऱ्यांचा पोलिस उपविभागीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू आहे.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. याचाचं विसर पोलिसांना पडलाय. याची प्रचीती देणारी घटना अकोल्यातून समोर आली आहे. अकोल्यातल्या बाळापूरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलाय. या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेत आत्महत्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिचे प्राण वाचवत कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखले केले. या मुलीची प्रकृती चिंताजनक असून ती सध्या कोमात आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस कर्मचारी फरार आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव पवन वडगावे असं आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ पीडित मुलीचे नातेवाईकांसह गावकऱ्यांनी पोलिस उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पवन वडगावे या पोलिस कर्मचाऱ्याला तातडीने अटक करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

या प्रकरणात बाळापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो तिथेच कार्यरत होता. त्यामुळे येथील पोलीसांनी पवन वडगावेला फरार होण्यास मदत केल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. दुसरीकडे हा तपास स्थानिक पोलिसांकडून वरिष्ठ पातळीवर वर्ग करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, घटनेनेनंतर तरुणीने स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. आज पीडित तरुणी ही मृत्यूशी झुंज देत असून अद्यापही आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला अटक होत नाही. त्यामुळं संबंधित ठाणेदार आणि आरोपी पोलिसाला मदत करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी शेडको समाज बांधव आणि नातेवाईकांचा पोलिस उपविभागीय कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन चाललं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com