मुखेड तालुक्यातील घटना, मुलांना जुंपले तिफणीला 
महाराष्ट्र

Special Story : काळाने हिरावला कुटुंबाचा आधार; मुलांनाच जुंपले तिफणीला

मुखेड येथून जवळच असलेल्या आबादीनगर तांडा येथील सखुबाई माधव चव्हाण या ४३ वर्षीय महिला आपल्या दोन मुलांसमवेत प्रपंचाचा गाडा हाकत आहेत.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

कुरुळा ( जिल्हा नांदेड ) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा चढता आलेख आणि नाही म्हंटले तरी ग्रामीण भागातील पुरुष प्रधान संस्कृतीचा पाश असे असतानाही नकारात्मक विचारांच्या पुरुषांनाही लाजवेल असं स्त्रीच दुर्मिळ कर्तृत्व त्यांच्या कामातून स्वयंसिद्ध होते. कुठलीही परिस्थिती माणसाला घडवत नाही तर माणूसच परिस्थिती घडवतो. यानुसार प्रतिकूल परिस्थिती असतानाही वर्षभराच्या भाकरीची तजवीज करण्यासाठी पुरुषी आधार नसताना एका स्त्रीने बैलाअभावी कुटुंबप्रमुख या नात्याने चक्क आपल्या दोन्ही मुलांच्या साहाय्याने पेरणीचा भार पेलला आहे.

मुखेड येथून जवळच असलेल्या आबादीनगर तांडा येथील सखुबाई माधव चव्हाण या ४३ वर्षीय महिला आपल्या दोन मुलांसमवेत प्रपंचाचा गाडा हाकत आहेत. तीन वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने पतीचे निधन झाले. दोन मुले एक मुलगी यांच्यासोबत जगण्याचा संघर्ष सुरु झाला. हल्लीच्या प्रगत युगात कृषी क्षेत्रात नानाविध यंत्रांचा शिरकाव झाल्याने शेतीकाम सोयीचे आणि सुलभ होण्याकरिता मनुष्यबळाचा वापर कमी होतो. बहुदा असे चित्र रंगवले जाते. परंतु ग्रामीण भागात वाडी तांड्यावरील परिस्थिती याला पूर्णतः विपरीत असते हे सत्य दर्शवणारी स्थिती आणि याचे जिवंत चित्र सखुबाईंच्या रुपात समोर येते.

हेही वाचा - जिंतूर शहरातील मंगल कार्यालयात पंढरीनाथ बुधवंत यांचा मुलगा गोविंद याचा विवाह अंबरवाडी येथील सुधाकरराव कांदे यांची मुलगी पूजा हिच्यासोबत संपन्न झाला.

आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने सखुबाईंनी त्यांची दोन मुले अजय आणि विजय यांच्या साहाय्याने बैलाअभावी पेरणी केली. शाळेत शिकणाऱ्या अजय आणि विजय या दोघांनी बैलाची भूमिका पार पाडली आजच्या आधुनिक युगात ही रील लाईफ वाटत असली तरी सखुबाईंचा नशिबी ही रिअल लाईफ आलेली आहे. बैल नसल्याने हार न मानता कुटुंबप्रमुख या नात्याने सखुबाई आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करत आपल्या जबाबदरीला संघर्षातून न्याय देताना दिसत आहेत. केवळ एक एकर जमिनीवर खडकाळ जमिनीवर धान्याची ओटी रिकामी करणाऱ्या सखुबाईंचा हा प्रवास स्त्रियांसह पुरुषांनाही प्रेरणा देणारा आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : सांगलीत भाजपनं केला करेक्ट कार्यक्रम; ४ प्रभागांमध्ये भाजपच्या पॅनलमधील सर्व उमेदवार विजयी

Zilla Parishad Election: महापालिकेतील विजयानंतर भाजपचे सूर बदलले; जिल्हा परिषदेसाठी स्वबळाचा नारा

शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या मुलाचा दारुण पराभव, EVM वर घेतला आक्षेप |VIDEO

Pune Results : भाजपच 'दादा'! राष्ट्रवादीला जबरी धक्का, वाचा पुण्यातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी

CM देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; मामेभावाचा दारुण पराभव

SCROLL FOR NEXT