Mumbai Local News Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: लोकल प्रवासी जनावरं आहेत काय? हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं; निर्लज्ज बाबूंना आतातरी जाग येणार का?

Mumbai Local News: लोकलमधल्या गर्दीमुळे दररोज सरासरी 6 प्रवाशांचा बळी जातोय. यावरूनच आता कोर्टानं रेल्वे प्रशासनाची कानउघडणी केलीय. प्रवासी म्हणजे जनावरं आहेत का? असा सवाल करत कोर्टानं रेल्वे प्रशासनाला चपराक लगावलीय.

Mayuresh Kadav

कधी दरवाजाला लटकत तर कधी गर्दीमध्ये घुसमटत...जीव मुठीत घेऊन करावा लागणार हा प्रवास, मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलाय. लोकल म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी, मात्र हीच जीवनवाहिनी आता प्रवाशांच्या जीवावर उठलीय. गर्दीमुळे दरोरज सरसरी 6 जणांना जीव गमवावा लागतोय. याच मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केलीय. प्रवाशांना जनावरं समजलात काय असा सवाल करत कोर्टानं रेल्वे प्रशासनाला सज्जड इशारा दिलाय.

हायकोर्टाने रेल्वेला फटकारलं

दररोज सरासरी 6 प्रवाशांचा मृत्यू होते मात्र रेल्वे गांभीर्यानं पाहात नाही. प्रवाशांच्या वाहतुकीबद्दल पाठ थोपटून घेऊ नका. जनावरांप्रमाणे प्रवास करायला लावणं हे अत्यंत लाजिरवाणं आहे. सबबी देऊ नका, तोडगा समोर ठेवा असं सांगत कोर्टाने रेल्वेला निर्वाणीचा इशारा दिलाय.

डोंबिवलीची रिया असेल किंवा अवधेश दुबे रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे दररोज कुणा न कुणाचा तरी बळी जातोय. मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस गर्दीचा ताण वाढतोय. तर दुसरीकडे रेल्वेचे अधिकारी मात्र एसी कार्यालयात बसून उपाययोजनांचे कागदी घोडे नाचवण्यात मश्गुल आहेत.

'साम टीव्ही'चे सवाल

  • जीवघेण्या गर्दीमुळे दररोज प्रवाशांचे बळी जात असताना रेल्वे अधिकारी झोपा काढतायेत का?

  • गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेकडून उपाययोजना का नाहीत?

  • मध्य रेल्वेवरील 15 डब्ब्यांच्या गाड्यांचं काय झालं?

  • 10 वर्षात मध्य रेल्वेच्या ताफ्यात एकही नवी लोकल का नाही?

  • 425 कोटी खर्चून तयार केलेला पाचवा, सहावा मार्ग केवळ शोभेसाठी आहे का?

केवळ लोकल प्रवास हाच कळीचा मुद्दा नाही तर रेल्वे स्टेशनवरील असुविधा, अस्वच्छता याबाबतीतही रेल्वे प्रशासनाला गांभीर्य नाही असं दिसून येतं. बऱ्याच रेल्वे स्थानकांवर अनेक कामं प्रलंबित अवस्थेत आहेत. त्याचा प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. लोकलचा प्रवास दिवसेंदिवस जिकरीचा बनत चाललाय.

मात्र यावर ठोस तोडगा काढण्याऐवजी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि डीआरएम एसी कार्यालयात बसून रेल्वेचा गाडा हाकत असल्यानं प्रवाशांच्या मनात संतापाची लाट आहे. रेल्वे अधिकारी ऐकत नाहीत, मनमानी करतात अशी तक्रार अनेक लोकप्रतिनिधींकडून ऐकायला मिळते. आता कोर्टानं फटकारल्यानंतर तरी या सरकारी बाबूंनी धडा घ्यायला हवा. अन्यथा लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवायला हवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: मविआत वाद? अनिल गोटे की जहागिरदार नेमका उमेदवार कोण? धुळ्यात उमेदवारीवरून पेच कायम

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT