Special Report Saam Digital
महाराष्ट्र

Special Report : खेळाडूंना 11 कोटी, शेतकऱ्यांना काय? क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची उधळण; वडेट्टीवार, विरोधकांचा सरकारवर निशाणा

Girish Nikam

गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. संघाताला 11 कोटी रुपयांचे बक्षिस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. या बक्षिसावरुन आता राजकारण रंगलं आहे. विधान भवन (राज्य विधिमंडळ संकुल) येथे ही घोषणा करण्यात आली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार करण्यात आला होता. पाहूया यावरचा एक रिपोर्ट..

टी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाची मुंबईत अगदी थाटात, जल्लोषात रॅली काढण्यात आली. पुढे वानखेडे स्टेडियमवर त्यांचा खास सत्कारही झाली. महाराष्ट्र सरकारलाही राहवलं नाही. विधान भवनात खेळाडुंचा मोठा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी 11 कोटींचं पारितोषिक जाहीर केलं. आता यावरुन राजकारण पाहायला मिळत आहे. सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

सत्कार समारंभात भारतीय संघाला ११ कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. त्यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा अभिमान आहे, मात्र सरकारी तिजोरीतून ११ कोटी रुपये देण्याची गरज नव्हती. द्यायचेचं होते तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून दिले पाहिजे होते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हसन मुश्रीफ यांनी मात्र विरोधक दोन्ही बाजूंनी बोलतात. बक्षीस दिलं तर का दिलं, ना दिलं तर का नाही दिलं, अशी टीका करतात. त्याला काही अर्थ नाही. १७ वर्षांनी विश्वचषक जिंकला आहे. त्याचा सन्मान झाला पाहिजे, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. क्रिकेटपटूंची श्रीमंती नेहमीच चर्चेचा विषय़ ठरला आहे. चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचं कौतुक हवंच. मात्र पोशिंद्या बळीराजाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. हेही तितकच खरं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नवरात्रीत PM मोदी 9 दिवस फक्त पाणी पितात : देवेंद्र फडणवीस

Mohammad Kaif: 'धोनीसाठीच नियम बदलला, जोपर्यंत तो खेळतोय..' मोहम्मद कैफच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Rinku Singh Tattoo: रिंकू सिंगच्या नव्या टॅटूची जोरदार चर्चा; पण 'Gods Plan'चा नेमका अर्थ काय? VIDEO

बारामती नाही, मग अजित पवार कुठून लढणार? पाहा VIDEO

kalyan Navratri 2024 : नवरात्रीनिमित्त कल्याणमधील देवींच्या 'या' प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT