Special Report Saam Digital
महाराष्ट्र

Special Report : 1 लाख टन कांदा खरेदीचा घोटाळा?; फेडरेशनच्या नावाखाली व्यापारी-अधिकाऱ्यांकडून लूट?

Onion Scam : नाशिकमध्ये एनसीसीएफची 1 लाख टन कांदा खरेदी संशयाच्या भोव-यात आलीय. व्यापारी आणि अधिका-य़ांच्या अभद्र युतीतून नाशिक कोट्यवधींचा कांदा खरेदी घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

Sandeep Gawade

विनोद पाटील , साम टीव्ही प्रतिनिधी

आता बातमी साम इन्व्हेस्टीगेशननं उघड केलेल्या सर्वात मोठ्या कांदा खरेदीच्या घोटाळ्याची.नाशिकमध्ये एनसीसीएफची 1 लाख टन कांदा खरेदी संशयाच्या भोव-यात आलीय. व्यापारी आणि अधिका-य़ांच्या अभद्र युतीतून नाशिक कोट्यवधींचा कांदा खरेदी घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. कांदा उत्पादक रडकुंडीला आलेला असताना हजारो कोटींचा मलिदा कुणी आणि कसा लाटला ?पाहुया यावरचा हा साम इन्व्हेस्टीगेशनचा रिपोर्ट.

सर्वात बेभरशाचं पीक म्हणजे कांदा. कारण शेतक-याला सर्वाधिक रडवतो तो कांदा. याच बेभरवशाच्या कांद्याला भरवशाचा दर मिळावा यासाठी केंद्रानं नाफेड आणि एनसीसीएफ अशा दोन संस्थांची निर्मिती केली. मात्र गेल्या एनसीसीएफनं केलेली तब्बल 1 लाख टन कांदा खरेदी संशयाच्या भोव-यात सापडलीय. फेडरेशन म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना आठवड्यात केवळ 1200 टन कांदा खरेदी करण्याची मर्यादा असताना एवढी 1 लाख टन कांदा खरेदी कशी केली असा प्रश्न निर्माण झालाय. कारण फेडरेशनच्या नावाखाली केलेल्या या खरेदीतून व्यापारी आणि अधिका-यांनी हजारो कोटींचा मलिदा लाटल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केलाय.

शेतक-यांच्या कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी एनसीसीएफच्या माध्यमातून अडीच लाख टन कांद्याची खरेदी सुरू आहे. सुरूवातीला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ निव़डताना गोंधळ होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार

व्यापारी आणि अधिका-यांची अप्रत्यक्ष भागीदारी असलेल्या महासंघांना कांदा खरेदीचे काम दिले गेले. या महासंघांनी 1,500 ते 1,700 रुपये दराने कांदा खरेदी केला. त्यानंतर गेल्या आठवड्यात ह्या साठवून ठेवलेल्या 1 लाख टन कांद्याची अवघ्या दोन दिवसात 3 हजार रुपये दरानं खरेदी करून एनसीसीएफ कांदा खरेदी पोर्टलवर दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलंय. यात क्विंटलमागे 1,200 ते 1400 रूपये नफा उकळल्याचा संशय आहे. काही अधिकारी आणि व्यापा-यांच्या अभद्र युतीतून हा हजारो कोटींचा गैरव्यवहार सुरू असल्य़ाची चर्चा रंगलीय. त्यामुळे या कांदा खरेदीची ईडी किंवा सीबीआय चौकशी करण्याची मागणी कांदा उइत्पादक शेतक-यांनी केलीय.

'नाफेड'च्या खरेदी केंद्रावर कांदा खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे 'नाफेड'चे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांच्या निदर्शनास आले होते. याबाबत 'नाफेड'ने कठोर पावले उचलली. मात्र 'एनसीसीएफ'च्या माध्यमातून असाच घोटाळ्या झाल्याचा संशय आता व्यक्त होतोय.

काय आहे कांदा खरेदीचं गौडबंगाल?

१३ मे रोजी 'एनसीसीएफ'च्या केंद्रावर खरेदी सुरू झाली. यात ४ टप्प्यांत म्हणजे १६५०, १८५०, २१०५, २५५५ रुपये दर निघाले. नंतर त्यात ग्राहक व्यवहार विभागाने अचानक बदल करून पुन्हा दिवसनिहाय दराची घोषणा केली. ते दर १९ ते २४ जूनपर्यंत वेगवेगळे होते. दरम्यान, २३ आणि २४ जून रोजी दर 3,१२४ आणि ३,१९० रुपये असताना सर्वाधिक खरेदी उरकण्यात आली. पुढे खरेदीचे पोर्टल दोन दिवस बंद ठेवल्याने आणखीनच शंका बळावली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केंद्रांवर ठरलेली खरेदी १० ते १५ टक्क्यांच्या आत होती. मात्र अचानक खरेदी ३० टक्क्यांच्या पुढे गेली. तब्बल १ लाख ७० हजार टन खरेदी झाल्याने यात घोटाळा झाल्याचा संशय आहे.

शेतक-यांच्या कांद्याला रास्त भाव मिळावा यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यामातून खरेदी करण्याचा उद्देश आहे. मात्र फेडरेशनच्या माध्यमातून अधिकारी आणि व्यापा-यांची अभद्र युती कांद्याचा मलिदा लाटत असल्याचा सामच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश झालाय. त्यामुळे शेतक-यांच्या पैशांवर डल्ला मारणा-यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT