soyabean 
महाराष्ट्र

इतिहास घडला; सोयाबीनला मिळाला उच्चांकी दर

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक घटली. दाेन हजार १८७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून त्यास दहा हजार ४०० रुपयांचा कमाल आणि आठ हजार ७०० रुपयांचा किमान तर दहा हजार दोनशे रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. हा दर या हंगामातील उच्चांकी दर असून यापूर्वी सोयाबीनचा दर नऊ हजार ५०० रुपयांवर पोहोचला होता.

लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या latur apmc market आडत बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोबायीनच्या भावात कमालीची तेजी राहिली आहे. सौद्यात सोयाबीनला soyabean दहा हजार २०० रुपये कमाल भाव मिळाला. तर शहरातील तेल उत्पादक कंपन्यांनी मात्र दहा हजार दोनशे रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली आहे. सोयाबीनच्या इतिहासात पहिल्यांदा दहा हजाराच्या पुढे भाव मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेंडीची मागणी, वायदे बाजारात होणारे व्यवहार, त्यात कमी असलेली आवक या सर्वाचा परिणाम सोबायीनचे भाव वाढण्यात होत आहे.

लातूर हे सोयाबीनचे आगार बनत आहे. हंगामात तर दररोज साठ ते सत्तर हजार क्विंटल सोयाबीनची आवक येथील बाजारपेठेत राहत होती. सोयाबीनच्या पेरणीच्या क्षेत्रातही सातत्याने वाढ होत आहे. परंतु गेली अनेक वर्षापासून सोयाबीनला सरासरी चार ते साडे चार हजार रुपये भाव राहिला होता. सोयाबीनाला सहा हजार रुपये भाव मिळावा म्हणून आंदोलनही झाली. खरं तर सहा हजारापेक्षा भाव कधी वाढलेच नाहीत.

या वर्षी कोरोनाच्या संकट काळात सुरवातीपासूनच सोयाबीनच्या भावात तेजी राहिली आहे. येथील आडत बाजारात आक्टोबरमध्ये सोयाबीनला कमाल भाव चार हजार १९० रुपये राहिला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्यात त्यात सातत्याने वाढ होत गेली आहे. फेब्रुवारीमध्ये पाच हजाराचा टप्पा पार झाला. मार्चमध्ये सहा हजारापर्यंत सोयाबीन गेले. एप्रिलपासून सोयाबीनच्या भावात कधीच मंदी आली नाही. साडे सात हजार, आठ हजार असे भाव वाढत गेला.

आता सोयाबीनने दहा हजार दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. अर्जेन्टिना व ब्राझील या देशात सोयाबीनच उत्पादन कमी झाले आहे. यामुळे मागणीत वाढ झाली आहे. चीन येथून मागणी मोठी होत आहे. देशांतर्गत पामतेलाच्या उत्पादनात घट झाल्याने सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे असे लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लालीतभाई शाह यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंची पाली गावातील शेतकऱ्यांसोबत संवाद

Rahul Gandhi H-Files : राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब, ब्राझिलच्या मॉडेलचे नाव घेत भाजपवर पुराव्यासह गंभीर आरोप

शिवसेना शिंदेसेनेला भाजपकडून जोरदार झटका; दोन बड्या नेत्यांची कमळाला साथ, काँग्रेसलाही खिंडार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही? कारण आलं समोर

Hruta Durgule: ‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा ! हृता दुर्गुळे - सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

SCROLL FOR NEXT