Gold Silver Price Today 15 March 2023 Saam TV
महाराष्ट्र

Gold Silver Price : लग्नसराईत मोठा धक्का! सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी ३३०० रुपयांनी महागली, वाचा आजचे दर

Gold Silver Rate : आज म्हणजेच बुधवारी सराफा बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Satish Daud

Gold Silver Price : मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर सुद्धा दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरणीचे सत्र सुरू होते. मात्र आज म्हणजेच बुधवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. (Latest Marathi News)

ऐन लग्नसराईत सोने-चांदी (Gold And Silver Price) दरात मोठी वाढ झाल्याने खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अशातच तुम्ही सुद्धा लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तर आधी त्याचे सुधारित दर जाणून घ्या कारण आज तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या (Gold Price) किंमती कालच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रतितोळा ७३० रुपयांनी महागले आहेत. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा ५ हजार ६७८ रुपयांवर पोहचला आहे.

आजचा चांदीचा भाव काय?

सोन्याबरोबर चांदीच्या (Silver Price)दरातही आज मोठी वाढ झाली. मंगळवारी चांदीचे भाव काही प्रमाणात घसरले होते. मात्र, बुधवारी सराफा बाजार खुलताच चांदीच्या दरात प्रतिकिलो ३ हजार ३०० रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. अचानक झालेल्या वाढीमुळे आज सराफा बाजारात १ किलो चांदीचा दर ७२ हजार रुपयांवर पोहचला आहे.

सोने चांदीची किंमत कशी ठरवली जाते?

भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, ही मध्यवर्ती संरचना आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री करतात.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT