The murder of mother-in-law by Alcoholic son-in-law, Nashik Crime News in Marathi, Nashik Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime : पती-पत्नीच्या वादात सासूची उडी; दारुड्या जावयाकडून सासूची हत्या

Ghoti Murder Case: बायको घरी येण्यास टाळाटाळ करत होती. बायको घरी येण्यास टाळाटाळ करत असल्याने तिचा पती किसन पारधी हा बायकोच्या माहेरी पोहचला.

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

घोटी, नाशिक: नाशिकमध्ये एका दारुड्या जावयाने सासूची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. नाशिकच्या (Nashik) घोटी तालुक्यात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला दारूचं व्यसन (Alcoholic) असल्याने त्याची बायको घरी येण्यास टाळाटाळ करत होती. बायको घरी येण्यास टाळाटाळ करत असल्याने तिचा पती किसन पारधी हा बायकोच्या माहेरी पोहचला. तिथे पोहचल्यावर त्याने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी सासू कमळाबाई भुतांबरे मध्यस्थी करायला गेल्या. मात्र संतप्त जावयाने सासूच्या पोटात आणि पाठीत कात्रीने भोसकून त्यांचा खून (Murder) केला. घोटीजवळच्या झारवडमध्ये ही घटना घडली आहे. (Nashik Crime News in Marathi)

हे देखील पाहा -

या घटनेनंतर आरोपी पतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुटुंबियांनी आरडाओरडा केल्या पळून जाण्याचा तयारीत असलेल्या जावयाला ग्रामस्थांनी पकडले आणि दोरीच्या साहाय्याने झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं गेलं. दरम्यान याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात जावयाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT