Trimbakeshwar Temple, Nashik saam tv
महाराष्ट्र

Trimbakeshwar Temple News: धक्कादायक! जमावाकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न

Trimbakeshwar Temple News: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

Nashik News: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला आहे.

या प्रकारानंतर परिसरात एक तणाव निर्माण झाला. त्यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले. त्र्यंबकेश्वर मंदिरात तणाव निर्माण होताच पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रकारानंतर जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पोलिसांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरानंतर सखोल चौकशी करून कारवाई करण्याची ब्राम्हण महासंघाने मागणी केली आहे.

राज्यातील अनेक भागांत तणावाची परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वरमध्ये देखील धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिस प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा ब्राह्मण महासंघाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात धक्कदायक प्रकार घडला. त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाने शिरण्याचा हट्ट धरला. त्यावेळी महाराष्ट्र सुरक्षा रक्षकाने रोखलं. या प्रकराने मंदिर प्रशासने पोलिस प्रशासनाला कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर पोलिस प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

Maharashtra News Live Update: नागपुरात अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटवर भरारी पथकाचा छापा

Stop eating onions: 30 दिवस कांदा खाल्ला नाही तर शरीरात घडतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT