Jaysingh Mohite Patil On Uttam Jankar Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Politics: उत्तम जानकरांनी खूप त्रास दिला, खोटे गुन्हे दाखल केले; मोहिते पाटील यांनी व्यक्त केली खंत

Jaysingh Mohite Patil On Uttam Jankar: 'लोकसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी मदत केली, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली नाही.' असे वक्तव्य जयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.

Priya More

विश्वभूषण लिमये, सोलापूर

'उत्तम जानकर यांनी मागील ५ वर्षांत मोहिते-पाटील कुटुंबाला खूप त्रास दिला आहे. वैयक्तिक माझावर खोटे गुन्हे दाखल केले.', अशी खंत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केली. 'लोकसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी मदत केली, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली नाही.' अशी नाराजी देखील जयसिंह मोहिते पाटील यांनी जाहिररित्या बोलून दाखवली.

उत्तम जानकर यांना माळशिरसमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे. जानकर यांच्या प्रचारसभेत बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी उत्तम जानकर यांच्या विषयीच नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. सध्या सोलापूरमध्ये उत्तम जानकर यांच्या जोरदार प्रचार सभा सुरू आहेत.

उत्तम जानकर आणि मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीत एकत्रित आले आहेत. विधानसभेला उत्तम जानकर यांना मदत करण्याचा शब्द मोहिते पाटील यांनी दिला होता. त्यानुसार उत्तम जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यातून एक लाखांचे मताधिक्य मिळणे अपेक्षित असताना ते 70 हजारांवर आले. ३० हजार मतं कुठे गेली असा सवाल उपस्थित करत तुमच्या कार्यकर्त्यांनी विरोधात मतदान केल्याचं जयसिंह मोहिते पाटील यांनी उत्तम जानकरांना सुनावले.

तसंच, 'मोहिते पाटीलांनी एकदा शब्द दिला की तो पाळला जातो. विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांना एक लाख पाच हजार इतके मताधिक्य मिळवून देऊ.' असं आश्वासन देखील जयसिंह मोहिते पाटील यांनी दिले. मोहिते पाटील आणि जानकर एकत्रित आले असले तरी जुने राजकीय वाद आणि वैर या निमित्ताने उकरून काढले जात आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही नेत्यांमध्ये प्रचारादरम्यान एकमेकांवर टोलेबाजी होत असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT