अमरावतीमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकारण चांगलेच तापले आहे. बसपाच्या उमेदवाराला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच पैशाचे देखील प्रलोबन दाखवण्यात आले. उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी बसपाचे उमेदवार डॉ. ढोणे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अमरावतीच्या तिसवा मतदारसंघातील ही घटना आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिवसा विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीकडून अधिकृत उमेदवारी दाखल केलेल्या डॉ. मुकुंद यशवंत ढोणे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुकुंद ढोणे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी असलेल्या विजय काळे यांनी पैशाचे प्रलोभन तसेच शस्त्राचा धाक दाखवून बरेवाईट करण्याची धमकी दिल्याची तक्रार तिवसा पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे.
डॉ. मुकुंद ढोणे यांनी तिवसा विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विजय काळे नामक व्यक्तीने फोनवर संपर्क साधून मुकुंद ढोणे यांना आर्वीच्या शिरपूर फाटा येथे बोलावून घेतले. तुम्ही जो उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तो ताबडतोब माघारी घ्या, त्याबदल्यात तुम्हाला मी पैसे देतो असे आमीष दाखवले. पण मुकुंद ढोणे यांनी माघार घेण्यास असहमती दाखविल्याने त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. चाकूच्या धाकावर विड्रॉल फॉर्मवर सह्या घेतल्या, अशी तक्रार डॉ.मुकुंद ढोणे यांच्याकडून तिवसा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तिवसा पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.