Ganesh Gite Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: मोदींच्या ताफ्यातील जवान अपघातानंतर बेपत्ता; कुटुंबासह शिर्डीहून परतत असताना अपघात

Dada Bhuse News: पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी गेले असता संतप्त गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला.

अभिजीत सोनावणे

Nashik News : केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाचा अपघातानंतर बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुचाकीवरून तोल जाऊन गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडल्यानंतर जवान वाहून गेल्याची माहिती आहे. गणेश गीते असं बेपत्ता जवानाचं नाव असून ते पंतप्रधानांच्या विशेष पथकात तैनात असल्याची माहिती आहे.

पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी गेले असता संतप्त गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. कॅनॉलचं पाणी रात्रीचं का बंद केलं नाही? कॅनॉलचं पाणी रात्रीचं बंद केलं असतं, तर आतापर्यंत जवानाचा शोध लागला असता, असं म्हणत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

गणेश गिते हे पत्नी व मुलांसह शिर्डी येथून घरी परतत असताना चोंढी शिवारात गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी गोदावरी उजव्या कालव्यात पडली. यावेळी जवानासह स्थानिक नागरिकांनी त्यांची पत्नी व मुलांना वाचवले. मात्र गणेश गिते हे पाटाच्या पाण्यात वाहून गेले. (Nashik News)

गणेश गिते हे २४ फेब्रुवारीपासून सुट्टीवर आले होते. गुरुवारी गणेश पत्नी रुपाली, मुलगी कस्तुरी आणि मुलगा अभिराज यांच्यासह शिर्डी येथे दर्शनासाठी बाईकने गेले होते.

शिर्डीहून परतत असताना नांदूरमध्यमेश्वर धरणातून गेलेल्या उजव्या कालव्याच्या बाजूने चोंढी शिवारात असलेल्या घराकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. घरापासून ३०० मीटर अंतरावर मेंढी-ब्राह्मणवाडे रस्त्यावर तवंग परिसरात ही घटना घडली. गणेश यांची बाईक ताबा सुटल्याने उजव्या कालव्यात पडली.

आवाज झाल्याने आजूबाजूला असलेले काहीजण धावत घटनास्थळी पोहोचले. त्यानतंर त्यांनी गणेशची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांना सुखरुप बाहेर काढलं. मात्र पाण्याच्या प्रवाहात गणेश वाहून गेले. या घटनेनंतर कुंटुबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'मुळे अर्थव्यवस्थेला खड्ड्यात? अर्धा कोटी लाडक्या बहिणींचा लाभ बंद?

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT