बिबी येथील जवानाचे हृदयविकाराने निधन संजय जाधव
महाराष्ट्र

बिबी येथील जवानाचे हृदयविकाराने निधन

सिंदखेडराजा तालुक्यातील बिबि या गावातील रहिवासी जवान किशोर काळूसे यांचा आपली सेवा बजावताना हॄदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे.

संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील बिबि Bibi या गावातील रहिवासी जवान किशोर काळूसे यांचा आपली सेवा बजावताना हॄदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे. जवान किशोर काळूसे हे ता. 4 ऑगस्ट रोजी अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये कर्तव्य बजावत असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्युसमयी त्यांचे वय अवघे 32 वर्ष होते.

हे देखील पहा-

जवान किशोर काळूसे हे वयाच्या 19 व्या वर्षी 2019 मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांनी सिलिगुडी व पंजाब मधील जालंदर येथे देश सेवा केली त्यानंतर 2019 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये त्यांची बदली झाली. ता. 4 ऑगस्ट रोजी आपले कर्तव्य बजावत असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जवान किशोर काळुसे हे नायब सुभेदार पदावर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक बहीण आणि एक भाऊ असा आप्तपरिवार आहे. शहीद जवान किशोर काळुसे यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांवर, मित्र परिवारावर तसेच संपूर्ण बीबी गावावर शोककळा पसरली. त्यांच्या अशा अचानक जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, भाजपचे बंडखोर प्रा. अनिल सोले यांची अखेर माघार

नायट्रोजन बॉम्बसारखी पसरली आग! मुंबईत १४ मजली इमारतीचा थरार; २ महिलांचा होरपळून मृत्यू, ४० जणांना वाचवले

Boat Accident: सरकारी नाव उलटून १३ चिमुकल्यांचा करुण अंत, पीएम मोदींकडून दुःख व्यक्त; ६ लाखांच्या मदतीची घोषणा

Wednesday Horoscope : मोठी संधी मिळेल; 5 राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT