Solapur Mahavitaran News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News : साडेपाच हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; थकीत बिल ठेवल्याने महावितरणची कारवाई

Solapur News : थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला असून ५ हजार ५९८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला

विश्वभूषण लिमये

सोलापूर : अधिकृत वीज कनेक्शन घेतल्यानंतर विजेचा वापर करून बिल भरणा करणाऱ्यांची संख्या कमी नाही. वारंवार (Solapur) आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा केला जात नाही. अशा थकीत बिल असलेल्या साडेपाच हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई (Mahavitaran) महावितरणने केली आहे. (Breaking Marathi News)

अनेक वीज ग्राहकांनी बिलाचा भरणा न केल्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर होत आहे. सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील २ लाख ५७ हजार ७९६ वीज ग्राहकांकडे ४६ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला असून ५ हजार ५९८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वीज खंडित केल्यानंतर पुन्हा पाहणी  
आर्थिक अडचणीत असलेल्या (MSEDCL) महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. सोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज जोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून थकबाकीदार विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी आणि संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT