solapur tuljapur road closed saam tv
महाराष्ट्र

Kojagiri Purnima 2023 : आजपासून चार दिवस सोलापूर- तुळजापूर मार्ग वाहनांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

प्रवाशांनी इटकळ, वैराग, बार्शी या मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूरहून तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालत जाण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यादृष्टीने भाविकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आजपासून (ता. २६) २९ ऑक्टोबर पर्यंत सोलापूर-तुळजापूर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी इटकळ, वैराग,बार्शी या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra News)

कोजागरी पौर्णिमेनिमित्त (kojagiri purnima 2023) श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यातून, शेजारच्या कर्नाटक राज्यातून पायी चालणाऱ्या देवी भक्तांची संख्या लाखोंच्या संख्येने असते. या काळात भाविकांना चालताना वाहनांचा अडथळा होऊ नये, यासाठी दरवर्षीप्रमाणे शहर पोलिस आणि ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने नियोजन आखले आहे.

याबराेबरच शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर हद्दीपर्यंत आणि पुढे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने आणि जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेशा बंदोबस्ताची कुमक तैनात केली आहे.

एरवी होणारी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी सोलापूर बोरामणीमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. हा बदल २९ ऑक्टोबरच्या रात्री बारापर्यंत अंमलात असणार आहे अशी माहिती अजय परमार (सहाय्यक पोलीस आयुक्त) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी अपडेट; मकर संक्रांतीच्या दिवशी ३००० रुपये होणार बँक खात्यात जमा? महत्वाची माहिती समोर

आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा, अनेक सरकारी कार्यालयं आंदोलकांच्या ताब्यात

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! लोकल रेल्वेच्या वाहतूक वेळेत बदल; या मार्गांवर असणार मेगा ब्लॉक

National Flower Lotus: फक्त भारत नाही 'या' देशांचही आहे कमळ राष्ट्रीय फूल

Maharashtra Live News Update: अखेर अकोट नगरपालिकेत एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा स्वतंत्र गट

SCROLL FOR NEXT