Solapur News Saam TV
महाराष्ट्र

Shocking Death : झोपेत बेडवरून पडल्याने वाहतूक पोलिसाचा मृत्यू, नेमकं काय घडलं ?

Solapur News : सोलापुरातील वाहतूक पोलिस अंमलदार यांचा झोपेत बेडवरून पडल्याने मृत्यू झाला आहे. पहाटे पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

  • सोलापुरातील वाहतूक पोलिस अंमलदारचा झोपेत बेडवरून पडल्याने मृत्यू

  • त्यांना अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होत, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

  • दोन लहान मुलांचा आधार हरपल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

  • पोलिस दलात आणि गावात शोककळा पसरली आहे

सोलापुरातून अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. पोलिस दलातील वाहतूक पोलिस अंमलदार यांचा झोपेत बेडवरून पडल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने पोलिस अंमलदार यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत पोलिस अंमलदार यांचे नाव संभाजी शिवाजी दोलतोडे ( वर्षे ३२ ) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी बेडवर झोपले होते. ते पहाटे पाचच्या सुमारास झोपेतच बेडवरून खाली पडले. त्यावेळी त्यांना डोक्यामागील बाजूस जबर मार लागला होता. त्यानंतर त्यांना उलटी झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटल येथे पहाटे साडेपाचच्या सुमारास दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

संभाजी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांकडे मृतदेह ताब्यात देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण, समोर येईल, असेही अधिकारी म्हणाले. त्याच्या अशा अचानक जाण्याने पोलिस दलातील सहकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील धक्का बसला आहे.

मृत पोलिस अंमलदार संभाजी दोलतोडे यांचे मूळगाव उपळाई खुर्द (ता. माढा) हे आहे. गोळा व थाळीफेक या खेळात ते तरबेज होते. संभाजी यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांना दीड वर्षाची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या अचानक जाण्याने दोलतोडे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे भाग्य फुलून येईल

Dombivli Crime: सुटकेसमध्ये आढळला २५ वर्षीय महिलेचा मृतदेह, खाडीत फेकली होती बँग

Maharashtra Live News Update: "पोरावरची केस मागे घे आणि ५ लाख दे..." निलेश घायवळची धमकी,गुन्हा दाखल

Suranache Kaap: जेवणासोबत तोंडी लावायला बनवा सुरणाचे कुरकुरीत काप, ५ मिनिटांत होतील तयार

Ind vs SA Test : भारतावर पराभवाचं सावट; 'शेर' का होताहेत ढेर? 'गंभीर' कारणं

SCROLL FOR NEXT