Solapur Shocking News  Saam Tv
महाराष्ट्र

Solapur: ८ वर्षे सोबत राहिले, पण प्रेमात धोका मिळाला, तृतीपंथीयाने आयुष्य संपवलं; आत्महत्येपूर्वी व्हिडीओ काढला अन्...

Solapur Police: सोलापुरमध्ये तृतीयपंथीच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली. प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केली. प्रियकराने प्रेमात धोका दिल्यामुळे नैराश्येत येऊन तृतीयपंथीयाने टोकाचे पाऊल उचलले.

Priya More

Summary -

  • सोलापुरमध्ये तृतीयपंथीयाने आत्महत्या केली

  • प्रेमप्रकरणातून त्याने टोकाचे पाऊल उचलले

  • प्रियकराचे दुसऱ्या तरुणीसोबत लग्न ठरले होते

  • तृतीयपंथीयाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आत्महत्या केली

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापुरमध्ये तृतीयपंथीयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकाराने धोका दिल्यामुळे नैराश्येत येऊन तृतीयपंथीयाने गळफास घेत आयु्ष्य संपवलं. या घटनेमुळे सोलापुरमध्ये खळबळ उडाली. आत्महत्या करण्यापूर्वी तृतीयपंथीयाने व्हिडीओ तयार करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणाचा तपास सोलापूर पोलिस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरच्या बाळे या गावात ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून तृतीयपंथीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. प्रकाश कोळी असं आत्महत्या केलेल्या तृतीयपंथीयाचे नाव होते. प्रकाश कोळीचे गेल्या अनेक वर्षांपासून सुजित जमादार या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघेही ८ वर्षांपासून एकत्र राहत होते. पण सुजितने प्रकाशला धोका दिला त्यामुळे तो नाराज झाला होता.

सुजित जमादारचे एका तरुणीसोबत लग्न ठरले होते. काही दिवसांतच त्याचे लग्न करणार होता. आपली फसवणूक करून सुजित दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करत असल्यामुळे प्रकाश नैराश्येत गेला. प्रकाश कोळीने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ तयार केला आणि प्रेमात धोका मिळाल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रकाशचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर शासकीय रुग्णालय परिसरात तृतीयपंथीयांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिस सध्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

SCROLL FOR NEXT