Solpaur,  saam tv
महाराष्ट्र

Crime News : २८ घरांची झडती, ९ ठिकाणी छापा; बाथरूम, हौद पाहताच पाेलीसांना बसला धक्का

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुरु केलेल्या 'ऑपरेशन परिवर्तन' अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur : साेलापूर जिल्ह्यात पाेलीसांनी एका विशेष माेहिमेतून २८ घरांची झडती घेतली. तसेच ९ ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पाेलीसांना (police) बाथरूम तसेच हौदात देखील बेकायदेशिररित्या तयार केली जाणारी दारू सापडली. त्यामुळे चुकीचं काम करणा-यांना पुन्हा एकदा चपराक बसली आहे. (Maharashtra News)

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा गावातील तब्बल 28 घरांची सोलापूर ग्रामीण पोलिसांनी झाडाझडती करण्यात आली. तसेच नऊ ठिकाणी छापे टाकून साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकारणी नऊ जणांवर सोलापूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Tajya Batmya)

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुरु केलेल्या 'ऑपरेशन परिवर्तन' अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ३० हजार ८०० लिटर गूळमिश्रित रसायन बॅरल, सिमेंटच्या हौदामधील, ८४० हातभट्टीची दारू रबरी ट्यूब आणि कॅनमधील २४० लिटर गूळपाक जप्त करण्यात आला आहे अशी माहिती नामदेव शिंदे (सहपोलीस निरीक्षक) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Update : सोलापुरमध्ये पावसाचा हाहाकार,! अक्कलकोटचा मराठवाडा आणि कर्नाटकशी संपर्क तुटला, शेती पाण्याखाली; बळीराजाचा आक्रोश

Sharad Pawar : बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा, पडळकरांचं वादग्रस्त विधान; शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

Maharashtra Live News Update: शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना फोन

Archaeological discovery: इतिहासातलं मोठं रहस्य उघड; पुरातत्त्व विभागाला सापडली बायबलमध्ये नमूद केलेली ३,००० वर्षे जुनी वास्तू

Royal Enfield ने जाहीर केली नवीन Price लिस्ट; Meteor मॉडेल्ससह सर्व बाईकची नवीन किंमत, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT