Solapur Crime News Saam TV News
महाराष्ट्र

Solapur : गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा, ५६ वर्षांच्या शिक्षकाने शाळेतच दहावीच्या मुलीचा विनयभंग केला

Solapur Latest Crime News : गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सोलापूरमध्ये समोर आली आहे. एका खासगी शाळेत दहावीच्या मुलीवर अति प्रसंग करण्यात आला आहे. याप्रकऱणी पोलिसांकडून तपास कऱण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Solapur Crime News : सोलापूरची मान शरमेने झुकणारी घटना समोर आली आहे. दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा शाळेतच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सालापूरमधील नामांकित शाळेमधील ५६ वर्षांच्या शिक्षकाने पार्किंमध्ये मुलीला आडवून धमकावले अन् इज्जत लुटली. ही धक्कादायक घटना समोर येताच शाळेत तर खळबळ उडालीच, पण सोलापूरमध्येही संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सोलापुरातील नामांकित शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांनीचा 56 वर्षीय शिक्षकाकडून विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली अन् एकच खळबळ उडाली. सोलापुरातील नामवंत खासगी शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १९ एप्रिल ते ३ जुलै यादरम्यान शाळेच्या पार्किंगमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. विनयभंग करणाऱ्या नराधम शिक्षकाने धमकावल्याने विद्यार्थिनीने कोणाकडेही याबाबतची तक्रार केली नव्हती. नराधमाने याचाच फायदा घेत वारंवार विनयभंग केला.

५६ वर्षांच्या शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थीनीसोबत लज्जास्पद प्रकार करत गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासला. तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, तू दहावीला आहे, तू आता चांगली सापडली आहेस.. अशा अनेक प्रकारे नराधमाने दहाव्या विद्यार्थ्यांनीला धमकी देत विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार खासगी शाळेच्या प्राचार्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी थेट मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधत गुन्हा दाखल कऱण्याचा सल्ला दिला. या धक्कादायक प्रकाराबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT