Eknath Shinde takes major action by dissolving Shiv Sena’s district executive in Solapur and Madha constituencies. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेनेत मोठी उलथापालथ,संपूर्ण कार्यकारणीच बरखास्त; शिंदेंच्या तडकाफडकी निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ

Solapur Politics: एकनाथ शिंदे यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे. नेत्यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे आणि अंतर्गत बदलांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Bharat Jadhav

  • एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

  • सोलापूर आणि माढा मतदारसंघात खळबळ

  • सर्व नियुक्त्या रद्द, नव्या बदलांची शक्यता

गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे पक्षातील अंतर्गत बदल करू लागले आहेत. जिल्हा प्रमुख नियुक्ती नंतर काम न करणाऱ्या मंत्री आणि पाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. आता हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोलापूर, माढा लोकसभेची अख्खी जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे या दोन्ही लोकसभेतील सर्व निवडी रद्द करण्यात आल्या आहेत.यामुळे या दोन्ही मतदार संघात खळबळ उडाली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी या दोन्ही मतदारसंघात आढावा बैठक घेतली. त्यानंतर आज तडकाफडकी निर्णय घेत जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारणी सोबतच महिला आघाडी, युवासेना आणि इतर प्रकोष्ट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता सोलापूर आणि माढा लोकसभेतील जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुखापर्यंतच्या सर्व निवडी रद्द करण्यात आल्या आहेत. शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोलापुरातील बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी गैरवर्तन केले होते, त्यामुळे श्रीकांत शिंदे संतापले देखील होते. त्यानंतर अखेर आज जिल्ह्यातील सर्वच कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. यामुळे आता आगामी काळात या दोन्ही मतदारसंघांना नवी कार्यकारिणी मिळण्याची शक्यता आहे.

यामुळे या ठिकाणी आता शिवसेनेची धुरा नवीन पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी, ‘सोलापूर, धाराशिव, माढा या लोकसभाचा आढाव आम्ही या बैठकीत घेत आहे. शिंदे साहेबांच्या आदेशाने संपर्क प्रमुख नेमण्यात आलेले आहेत. ते सर्व जबाबदारी पार पाडत आहेत. आम्ही लोकसभानिहाय आढावा घेण्यात येत आहे, यानंतर अगदी वार्डनिहाय देखील आढावा घेतला जाईल. जिल्हापरिषद, महापालिका निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळालं असल्याचं शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : दुहेरी हत्याकांडातील साक्षीदार; महाराष्ट्रातून अपहरण, शेजारच्या राज्यात नेऊन हत्या, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवासी बसला इंधन टँकरची धडक; अपघातानंतर भडका उडाला, १६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्पती रामनाथ कोविंद यांनी घेतलं काळाराम मंदिरात दर्शन..

Swollen feet causes: सतत पाय सुजतायत का? तुमच्या शरीरात लपलेत हे ६ गंभीर आजार

कल्याणची देसाई खाडी प्रदूषणाच्या विळख्यात; सांडपाण्यामुळे जलपर्णीचा सुळसुळाट

SCROLL FOR NEXT