Sena–NCP Alliance Changes Political Equations Saam
महाराष्ट्र

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र, सोलापुरातील राजकारण फिरणार

Sena–NCP Alliance Changes Political Equations: आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र. राजकीय समीकरणे फिरणार.

Bhagyashree Kamble

  • सोलापुरातील राजकीय घडामोडींना वेग

  • शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र निवडणुका लढणार.

  • महायुती अन् महाविकास आघाडीत बिघाडी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणुकीसाठी मतदारांना आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी तसेच महायुतीतील नेत्यांकडून सुरू आहे. अशातच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. डिसेंबर महिन्यात या निवडणुका पार पडतील. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर पक्षांतरालाही वेग आला आहे. सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र लढणार असल्याची माहिती समोर आलं आहे. यामुळे सोलापुरात राजकीय समीकरणे फिरणार.

सोलापूर जिल्ह्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. कुर्डूवाडी नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने युती करणार असल्याचं निश्चित केलं आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी ही युती असल्याचं नेते मंडळींनी सांगितलं आहे.

एकीकडे काही पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. तर, दुसरीकडे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. मात्र, सोलापुरात महायुती आणि महाआघाडीमध्ये बिघाड झालं असल्याचं चित्र आहे. दोन्ही पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी नगरपरिषद निवडणुकांसाठी एकत्र लढणार असल्याचे सांगितले. माढ्याचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांची मध्यस्थी ही युती झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी प्रत्येकी १० जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा शिवसेना शिंदे गटाचा असणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात पहिलं वेगळं राजकीय युती पाहायला मिळाले असून, या युतीची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : 'मी तुझ्या वडिलांची हत्या..' नवऱ्याची हत्या करून बॅगेत भरलं; बायकोनं थेट मुंबई गाठली अन्..

वर्गात ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने मुस्लिम शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण|VIDEO

हनीमूनला गेल्यावर रूमची लगेच लाईट लावता? 'ही' चूक पडेल महागात? तज्ज्ञ काय सांगतात?

Chakli Tips: घरी असलेल्या चकल्या मऊ झाल्यात? या सोप्या टिप्सने पुन्हा होतील कुरकुरीत आणि खुसखुशीत

Maharashtra Live News Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसने केली मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT