solapur crime news, youth, arrests,  Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणाऱ्याला अटक

साेलापूर पाेलीसांची कारवाई.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : चारित्र्य पडताळणीसंबंधी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यास सोलापूर पोलीसांनी अटक केली. विशाल भारत येलगुंडे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. (Maharashtra News)

पाकणी ता.उ.सोलापूर येथील एकजण बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण कार्यालयास प्राप्त झाली. त्यानूसार पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपासाच्या सूचना दिल्या.

त्यावरून पोलीस निरिक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश खेडकर यांनी माहितीची पडताळणी केली. पाकणी येथील एकजण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून आणि त्यावरील डिजिटल सहीच्या चिन्हाचा फसवणुकीकरता गैरवापर करून बनावट प्रमाणपत्र देत असल्याचे उघड झाले.

त्यावरून चंद्रकांत बाबूराव पवार यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून विशाल भारत येलगुंडे याच्यावर (कलम 420, 464,465, 468, 471 माहिती तंत्रज्ञान अधिनिमय 2005 चे कलम 66 (क) प्रमाणे) गुन्हा दाखल करुन अटक केली. संशयिताची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

IPS Officer Transfer: १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, पोलिस दलात खळबळ; कुणाची कुठे नियुक्ती?

Entertainment News : अभिनेत्री सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांच्या घरी चिमुकलीचे आगमन

Eye care tips: मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर होतोय परिणाम? दुर्लक्ष केल्यास दृष्टीला बसू शकतो मोठा फटका!

CJP Protest : मेट्रो आणि ट्रेन लगेच सुरू करा!; सुप्रीम कोर्टाचा संताप, सरकारला दिलं महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT