Joint operation in Solapur's Chandan Nagar ends with Pune gangster Shahrukh Sheikh being shot dead — heavy police presence and forensic team on site. Saam TV News
महाराष्ट्र

Encounter: पुण्यातील शाहरूखचा सोलापुरात एन्काउंटर; बायको अन् वडिलांचा पोलिसांवर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Shahrukh Sheikh Shot Dead: पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शाहरूख शेख याचा लांबोटी गावात एन्काउंटर. पोलिस कारवाईदरम्यान जागीच ठार. नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप, सोलापुरात तणावाचं वातावरण.

Bhagyashree Kamble

मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे सराईत गुन्हेगार शाहरूख उर्फ अट्टी रहिम शेखचा एन्काउंटर करण्यात आला. पुणे क्राईम ब्रँच आणि मोहोळ पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान आरोपी जागीच ठार झाला. त्याच्यावर पुणे शहरातील चार पोलीस ठाण्यांत तब्बल १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते आणि त्याच्याविरोधात मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून तो फरार होता. या घटनेनंतर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात शाहरुखच्या वडील, पत्नी आणि इतर नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. तसेच पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

शेखची पत्नी म्हणाली, 'पोलिसांचे १० ते १५ जणांचे पथक चंदननगर परिसरात घरात शिरलं. शाहरुख झोपलेला असताना पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. तो खाली पडल्यावर त्याने पिस्तूल उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पुन्हा फायरिंग करण्यात आलं. पोलिसांनी माझे केस ओढून मला बाजूला केलं. शाहरुख सुधरला होता. दीड वर्षांपासून त्यानं गुन्हेगारी थांबवली होती. पण तरीही पोलिसांनी शाहरूखवर गोळीबार केला', असा आरोप त्याच्या बायकोनं पोलिसांवर केला आहे.

शाहरुखचे वडील रहिम शेख यांनीही पुणे शहर पोलिसांवर आरोप करत सांगितले की,'तीन महिन्यांपासून पोलीस त्याला पळवत आहेत. आत्याकडे १०-१५ दिवसांपूर्वी आला होता. तिथे येऊन पोलिसांनी त्याचा एनकाउंटर केला. माझ्या मुलानं सगळं सोडलं होतं. पोलीस पैसे खाण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत', असा आरोप शाहरूखच्या वडिलांनी केला आहे.

पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल

पुण्यातील कुख्यात सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहिम शेख याचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील चंदननगर परिसरात पुणे पोलिसांच्या कारवाईत एन्काऊंटर करण्यात आला. एन्काऊंटरनंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, घटनेचा पंचनामा सुरू आहे. चंदननगर परिसरातील संबंधित घर पोलिसांनी सीलबद्ध केलं आहे. दरम्यान, डॉक्टर्स आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा सुरू आहे. घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT