Holi Festival 2024: Saamtv
महाराष्ट्र

Solapur News: सोलापुरातील अनोखी धुलवड! दोन गटांमध्ये झाली तुफान दगडफेक; ४०० वर्षांची प्राचीन परंपरा

Holi Festival 2024: गावातील जगदंबा मंदिराच्या गडावर एक गट तर गडाच्या पायथ्याशी दुसरा गट थांबून एकमेकांवर दगडफेक करतो. मागील चारशे वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.

Gangappa Pujari

bhoyare Village Unique Holi Celebration:

देशासह राज्यभरात धुलिवंदन जल्लोषात साजरी केली गेली. महाराष्ट्रात विविध भागात धुलवडीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने आणि प्राचीन परंपरेनुसार साजरा केला जातो. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील भोयरे गावातही अशीच एक अनोखी परंपरा आहे. गावामध्ये चक्क एकमेकांवर दगडाचा वर्षाव करुन धुलवड साजरी केली जाते.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या भोयरे गावात दगडांची अनोखी होळी खेळली जाते. भोयरे गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवड दिवशी एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार गावातील जगदंबा मंदिराच्या गडावर एक गट तर गडाच्या पायथ्याशी दुसरा गट थांबून एकमेकांवर दगडफेक करतो.

मागील चारशे वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. या दगडफेकीत गावकऱ्यांना दगड लागला तरी काहिही होत नसल्याची भावना आहे. यामध्ये जरी एखादा जखमी झाला तर जखमींना देवीच्या मंदिरात बसवून भंडारा लावला जातो. तसेच या दगडफेकीत आजपर्यंत एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळवडी दिवशी दिवसभर गावातील तरुण दगड-गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात. जगदंबा देवीच्या पायऱ्यावर जेवढे जास्त रक्त सांडते. त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT