Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur : पोहण्यासाठी विहिरीत उड्या घेताच विहिरीची कडा ढासळली; दोन शाळकरी मुले बुडाली

Solapur News : मामाच्या गावावरून परीक्षेचा निकाल घेण्यासाठी गावी आला होता. तर दुसरा आत्याकडे शिक्षणासाठी राहत होता. आज निकाल असल्याने वडिलांनी त्याला निकाल घेण्यासाठी बोरामणी येथे बहिणीकडे पाठवले

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सुट्या असल्याने गावातील पाच- सहा मुले जवळच असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी विहिरीत उड्या घेताच विहिरींच्या आजूबाजूला बांधलेल्या दगडाची कडा अचानक ढासळली. यामुळे विहिरीत पोहणारी मुले तेथेच अडकली. यातील काही जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले असून दोन मुले मात्र या घटनेत बुडाली आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथे दत्ता शेळके यांच्या शेतात असलेल्या विहिरीत हि घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. भीमरत्न हरीशचंद्र राजगुरु (वय १४) आणि नैतिक सोमनाथ माने (वय १५) हि दोन मुलं विहिरीत अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकजण मामाच्या गावावरून सुट्ट्या संपवून परीक्षेचा निकाल घेण्यासाठी गावी आला होता. तर दुसरा मुलगा आपल्या आत्याकडे शिक्षणासाठी राहत होता. आज शाळेचा निकाल असल्याने वडिलांनी त्याला निकाल घेण्यासाठी बोरामणी येथे बहिणीकडे पाठवले होते.

निकाल पाहून दुपारी गेले पोहायला 

विहिरीत बुडालेली ही दोन्ही मुलं कालच बोरामणी येथे आले होते. तर ते सकाळी शाळेत जाऊन आपला निकाल घेतला. यानंतर घरी आल्यानंतर गावातील मित्रांसोबत जवळच असलेल्या विहिरीवर पोहायला गेली होती. साधारण ७० ते ८० वर्षे जूनी आणि ५० ते ६० फूट खोल विहीर असल्याची माहिती समोर येत आहे. सर्व मित्रांनी विहिरीत उड्या मारल्यानंतर काही वेळातच विहिरींची दगडी कडा ढासळल्याने विहिरीतील मुले त्या खाली दबले गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

तिघांना बाहेर काढण्यात यश 

दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गावातील रवी मटके यांना घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्याने इतर लोकांच्या मदतीने तीन मुलांना विहिरीतून वाचवले आहे. मात्र दोघांना काढता आले नाही. यामुळे महसूल प्रशासन आणि सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने विहिरीतील पाणी काढून बुडालेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून घटनास्थळी पोलीस यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा आणि महसूल अधिकारी दाखल झाले आहेत. घटनास्थळी बोरामणी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दाखल झाले असून मुलांच्या नातेवाईकांचा आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भारतीय सेनेचा जवान शहीद

Marathi Movie: एक एन्ट्री… आणि सगळं बिघडलं! 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हास्यासोबत सस्पेन्सचा तडका

Panipuri Ragda Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा चटपटीत पाणीपुरी रगडा, सोपी आहे रेसिपी

खळबळजनक! दिवसाढवळ्या एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pune Municipal Corporation: मुंबईनंतर पुणे महापालिकेतही 'स्वीकृत' नगरसेवकपदाचे वेध; भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू

SCROLL FOR NEXT