Solapur News student ended his life journey because his parents did not give him a mobile phone kusur village Saam TV
महाराष्ट्र

Solapur News: मोबाईल घेऊन न दिल्याने बारावीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन; मन सुन्न करणारी घटना

Solapur Latest News: आई-वडिलांनी मोबाइल घेऊन न दिल्याने बारावीत शिकत असलेल्या एका तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur 12th Student Death News

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांनी मोबाइल घेऊन न दिल्याने बारावीत शिकत असलेल्या एका तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुसूर गावात शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

आकाश राजकुमार पुजारी, असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश हा मंद्रूप मधील महात्मा फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता. मला मोबाईल घेऊन द्या, अशी मागणी तो आपल्या आई-वडिलांकडे करीत होता.

मात्र, घरची परिस्थिती बेताची (Solapur News) असल्याने आई-वडिलांनी आकाशला मोबाईल घेऊन देण्यास नकार दिला. यावरुन आकाशला राग अनावर झाला. याच रागाच्या भरात त्याने शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. रविवारी पहाटेनंतर आकाश घरात न दिसल्याने आई-वडिलांनी त्याची शोधाशोध घेतली.

यावेळी आकाशचा मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आकाशचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात आकास्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT