Solapur News Guinness Book Record Saam tv
महाराष्ट्र

Solapur News: सोलापूरच्या तरुणाचे मोडले अमेरिकेचे रेकॉर्ड; कार्ड थ्रोमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, तिसऱ्यांदा गिनीज बूकमध्‍ये नोंद

सोलापूरच्या तरुणाचे मोडले अमेरिकेचे रेकॉर्ड; कार्ड थ्रोमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, तिसऱ्यांदा गिनीज बूकमध्‍ये नोंद

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरमधील अठरा वर्षीय आदित्य कोडमूरचे नाव गिनीज बूकमध्ये (Guinness Book) नोंदवले गेलेय. विशेष म्हणजे आदित्यने तीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवून गिनीज बुकमध्ये तिसऱ्यांदा नाव कोरलय. पत्त्याच्या डावातील कार्ड (Solapur) फेकण्यात म्हणजेच कार्ड थ्रो या प्रकारात आदित्यने हे वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.निर्धारित टारगेटवर (लक्ष्य) अचूकपणे खेळण्यातील पत्ते फेकण्यात त्यानं अमेरिकेच्या (America) कार्ड थ्रोअरचे रेकॉर्ड मोडलेय. आता 'कार्ड थ्रो'चं वर्ल्ड रेकॉर्ड आदित्यच्या नावावर जमा झालंय. (Tajya Batmya)

अमेरिकेन थ्रोअर रिचमिक्स ज्युनिअर याने ह्युमन टारगेटवर ५६ कार्ड अचूकपणे थ्रो करून गिनिज बुकात आपल्या नावाची नोंद केली होती. मात्र आदित्यने एका मिनिटात ६६ कार्ड थ्रो करून स्वतःचे नाव या रेकॉर्डवर कोरले आहे. गेल्या आठ वर्षांपासून आदित्य वेगवेगळे जादूचे प्रयोग करून दाखवतो.

जानेवारीमध्‍ये केली होती कामगिरी

मात्र आपण काहीतरी वेगळे करावे. यासाठी त्याने तब्बल दोन वर्षे सराव केला. त्यानंतर जानेवारी २०२३ रोजी त्याने कार्ड थ्रो केले. त्यानंतर चार महिन्यांनी त्याला गिनीज बूकमध्ये आपले नाव नोंदले गेल्याचे ईमेलद्वारे सांगण्यात आले. दरम्यान त्याच्या रेकॉर्डमुळे आता जगभरात सोलापूरचा डंका वाजतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ याला परदेशातून आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Painkiller Side Effects: तुम्हाला कल्पनाही नसेल इतकी पेनकिलर आरोग्यावर करते परिणाम

Pune Terror Attack : पुण्यात खळबळ! 'I Love Mohammad' नंतर आता 'इस्लाममध्ये संगीत हराम आहे' आशयाचे पोस्टर्स झळकले

Myanmar: म्यानमारमध्ये बौद्ध उत्सवाला लक्ष्य, पॅराग्लायडरद्वारे बॉम्ब टाकले; २४ जणांचा मृत्यू

Kantara Chapter 1: 'हा चित्रपट आणि पात्र...'; ऋषभ शेट्टीने सांगितलं 'या' कारणामुळे 'कांतारा' ब्लॉकबस्टर होऊ शकला

SCROLL FOR NEXT