Solapur Temperature Saam tv
महाराष्ट्र

Solapur Temperature : कडक उन्हाने सोलापूर तापले; पारा चाळीस अंशाजवळ

Solapur News : यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने उन्हाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विश्वभुषण लिमये

सोलापूर : यंदा उन्हाची तीव्रता अधिक राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याची दाहकता आतापासून जाणवू लागली असून (Solapur) सोलापूरमध्ये उन्हाची तीव्रता वाढली असून आज नोंदविण्यात आलेले (Temperature) तापमान हे चाळीस अंशाच्या जवळ पोहचले असून कडक उन्हाने सोलापूर तापल्याचे जाणवू लागले आहे. (Live Marathi News)

यंदा अपेक्षित पाऊस (Rain) झाला नसल्याने उन्हाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सोलापुरातील उन्हाचा तडाखा सोलापूरकरांना जाणवत आहे. सोलापुरातील तापमान ४० अंशाच्या जवळ पोहोचला आहे. तो टप्पा पुढील आठवड्यात पार होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाचा (High Temperature) परिणाम शेतीचे कामे, दुपारी प्रवास करणे, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचे आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदाचे उच्चांकी तापमान 
सोलापुरात यंदाच्या वर्षी उन्हाळ्यातील उच्चांकी ३९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद  झाली आहे. सोलापूरकरांना उन्हाच्या झळा आज दिवसभर जाणवत आहेत. सोलापुरातील तापमान १२ मार्चला ३९.४ अंश सेल्सियस होते. त्यात आज ०.४ अंशाने वाढ झाल्याने कमाल तापमान ३९.८ अंशापर्यंत गेले आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; मुलीच्या लग्नाची चिंता, आमदार विजय शिवतारे धावले संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीला

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

Virar Dahanu Local : वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला आग; विरार ते डहाणू लोकलसेवा ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT