Solapur Police Constable End Life Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News: ड्युटीवरून घरी आला अन् आयुष्याचा शेवट केला, पोलिस कॉन्स्टेबलच्या आत्महत्येने सोलापूर हादरलं

Solapur Police Constable End Life: सोलापूर पोलिस मुख्यालयामध्ये सेवा बजावणारे महेश ज्योतीराम पाडुळे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस कॉन्स्टेबलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश ज्योतीराम पाडुळे असं या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून ते सोलापूर पोलिस मुख्यालयामध्ये कार्यरत होते. गावाकडे आपल्या बायको आणि मुलांना भेटायला गेले असता त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर पोलिस मुख्यालयामध्ये सेवा बजावणारे महेश ज्योतीराम पाडुळे यांनी अज्ञात कारणावरून बार्शी तालुक्यातील वैराग येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वैराग पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. माढा तालुक्यातील अंजनगावचे मूळ रहिवासी असलेले महेश पाडुळे हे वैराग पोलिस ठाण्यामध्ये रुजू झाल्यानंतर कुटुंबासह वैराग येथे राहत होते. त्यानंतर त्यांची बदली सोलापूर मुख्यालय येथे झाली होती.

बुधवारी महेश पाडुळे ड्युटीवरून घरी आले. घरी पोहचताच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना वैराग येथील वैराग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक ६ वर्षांचा मुलगा, एक आठ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास वैराग पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT