Solapur Airport Saam tv
महाराष्ट्र

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी खुशखबर; मुंबई आणि बंगळूरू विमानसेवा होणार सुरु, २० सप्टेंबरपासून तिकीट बुकिंग

Solapur News : काही दिवसांपूर्वीच सोलापूर-गोवा विमानसेवा सुरु झालीय, ज्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असून मुंबई व बेंगळुरू या दोन्ही शहरासाठी 20 सप्टेंबरपासून नागरिकांना विमान तिकीट बुकिंग करता येणार आहे

विश्वभूषण लिमये

सोलापूर : बहुप्रतीक्षित असलेल्या सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि बंगळूरसाठीच्या विमान सेवेला अखरे मुहूर्त मिळाला आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची सोलापूरकरांची असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे. या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या उड्डाणासाठी २० सप्टेंबरपासून तिकीट बुकिंगला सुरवात केली जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. 

सोलापूर विमानतळावरुन विमान कधी उडणार याची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा आणि चर्चा सुरु होती. मात्र काही अडचणींमुळे हि विमानसेवा सुरु होत नव्हती. दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक तारख्या समोर आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात विमानसेवा सुरु होण्यात अडचणी येत होत्या. अखेर मुंबई आणि बंगळूरसाठी विमानसेवा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे १५ ओक्टोम्बरला पहिले उड्डाण होणार आहे. 

२० सप्टेंबरपासून तिकीट बुकिंग 

सोलापूर- मुंबई आणि सोलापूर- बंगळुरू या दोन्ही ठिकाणी सुरु होत असलेल्या विमानसेवेसाठी तिकिट बुकिंगला २० सप्टेंबरपासून सुरवात केली जात आहे. सोलापूरमध्ये काही दिवसांपूर्वीच सोलापूर- गोवा विमानसेवा सुरु करण्यात आली. या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळतोय. यानंतर सोलापूरकरांसाठी मुंबई व बंगळूरला जाणे सहज सोपे होणार आहे. अर्थात सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी वर्गाला याचा अधिक फायदा होणार आहे.  

असे असणार उड्डाण 

मुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान १५ ऑक्टोबरला दुपारी १२.५५ मिनिटांनी सोलापूर- मुंबई असे पहिले उड्डाण होणार आहे. यानंतर दुपारी २.४५ वाजता मुंबई- सोलापूर विमानसेवेस प्रारंभ होईल. तर सकाळी ११.१० वाजता बंगळूरू-सोलापूर आणि दुपारी ४.१५ वाजता सोलापूर-बंगळूरू असणार विमानसेवा सुरु होईल 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपा किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT