Solapur MNS Anil Vyas Death threat Saam TV
महाराष्ट्र

MNS News : विधानसभेची निवडणूक लढवली तर गोळ्या घालून ठार मारू, मनसे नेत्याला जीवे मारण्याची धमकी

Solapur MNS Anil Vyas Death threat : विधानसभा निवडणूक लढवली तर तुम्हाला जीवे मारू, अशी धमकी सोलापूर मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल व्यास यांना आली आहे.

विश्वभूषण लिमये

आगामी विधानसभेची निवडणूक लढवल्यास गोळ्या घालून ठार मारू, अशी धमकी सोलापूर मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल व्यास यांना आली आहे. विकास इंगळे नामक व्यक्तीकडून फोनवरून ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने हातात पिस्तूल घेतलेले फोटोही अनिल व्यास यांच्या व्हाट्सअपवर पाठवले आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

या धमकीप्रकरणी अनिल व्यास यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. अनिल व्यास हे मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभेची निवडणूक लढवण्यात ते इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरु केली असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

अनिल व्यास यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय की, "मी सध्या मुंबईत असून आज गुरुवारी (ता. ३) नवी मुंबई महापालिकेच्या जवळून कारने प्रवास करीत असताना अचानक मला अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्यावेळी कार साईडला घेऊन मी कॉल उचलला. तेव्हा समोरील व्यक्तीने मला मी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं".

"त्याला मी कामाची विचारणा केली असता, तू सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभेची निवडणूक लढवू नकोस, जर लढवली तर तुला गोळ्या घालून ठार मारेल, अशी धमकी दिली. यानंतर आरोपीने फोट कट केला आणि मला व्हॉट्सअॅपवर हातात बंदूक घेऊन असलेले फोटो पाठवले", असं अनिल व्यास यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय.

दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या या तक्रारीची दखल घेतली असून धमकी देणार्‍या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या मनसे नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी आल्याने सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT