Solapur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Solapur: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई, माजी उपमहापौरासह ७ जणांविरोधात गुन्हा

Solapur Crime: सोलापूरमध्ये ओंकार हजारे यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. माजी उपमहापौर आणि त्यांच्या पत्नीसह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

सोलापूरातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार हजारे यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उपमहापौर नाना काळे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ओंकार हजारेच्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या युवक नेत्याच्या आत्महत्या प्रकरणी माजी उपमहापौर, त्याच्या पत्नीसह सात जणांविरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ जून रोजी कोणाला न सांगता ओंकार हजारे हे घराबाहेर पडले होते.मात्र बराच वेळ घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. शोध घेतल्यानंतर सुपर मार्केट येथे ओंकार हजारे हा कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत दिसून आला.

ओंकार यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. ओंकार हजारे हा अजित पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. ओंकार हजारे यांच्या आत्महत्याप्रकरणी माजी उपमहापौर नाना काळे, पत्नी स्वाती हजारे, ज्ञानेश्वर पवार, जयश्री पवार, मंगेश पवार, निखिल बनसोडे, ओम घाडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार आणि स्वाती यांचा २०१९ साली प्रेम विवाह झाला होता. स्वातीच्या कुटुंबीयांचा प्रेम विवाहला विरोध होता. ओंकारला त्यामुळे स्वातीचे कुटुंबीय त्रास देत होते. सासरची मंडळी आणि माजी उपमहापौर नाना काळे त्रास देत असल्याचा समाज माध्यमांवर स्टेटस ८ जून रोजी ओंकारने ठेवला होता. स्वाती ओंकारकडे घटस्फोट मागत होती. त्यासाठी सासरची मंडळी आणि नाना काळे त्रास देत असल्यामुळेच आत्महत्या केल्याच्या कारणावरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Cash Deposit: कॅश डिपॉजिट कराचीय, पण बँकेच्या गर्दीचं टेन्शन आलंय? UPI मिटवेल चिंता, जाणून घ्या पैसे जमा करण्याची प्रक्रिया

Mughal harem : मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळी कोणते नियम पाळावे लागत असत?

Nanded : नियमबाह्य कारभार भोवला; नांदेड जिल्ह्यात २८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दणका; 'या' महिलांना १५०० रुपये मिळणार नाही पाहा, VIDEO

Ahilyanagar News : दारू पितो, महिला नाचवतो, दहशत करतो; तृप्ती देसाईंचे भाजप नेत्यांवर गंभीर आरोप, थेट पुरावाच दिला

SCROLL FOR NEXT